सध्याचा करोना विषाणू हा चीनमधील वुहान येथून पसरलेला नसून तो प्राण्यांमधून माणसात पसरत असल्याने तो नैसर्गिकच आहे, असे वैज्ञानिक पुराव्यांची छाननी करून जागतिक वैज्ञानिक चमूने म्हटले आहे. ७ जुलैला झेनोडो या प्रिंट सव्र्हरवर संशोधनाची पडताळणी करून जाहीर करण्यात आलेले निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजूनही करोनाचा विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून पसरल्याचे मानले जात असून २१ वैज्ञानिकांनी याबाबत आतापर्यंत सादर करण्यात आलेल्या वैज्ञानिक पुराव्यांची छाननी करून मते मांडली आहेत. त्यांच्या मते हा विषाणू प्रयोगशाळेतून पसरलेला नाही. ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील प्राध्यापक एडवर्ड होम्स यांनी म्हटले आहे की, आम्ही या पुराव्यांचे काळजीपूर्वक व समीक्षात्मक विश्लेषण केले असून त्यात हा विषाणू कुठल्याही प्रयोगशाळेतून आल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. या संशोधन निबंधातील निरीक्षणानुसार आधीचे जे विषाणू रुग्ण होते त्यांचा वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीशी संबंध नाही. हा विषाणू प्राण्यांच्या बाजारपेठेतून परसल्याच्या शक्यतेला दुजोरा देणारे साथरोगशास्त्रीय दुवे मात्र काही प्रमाणात आढ़ळून आले आहेत. करोना साथीपूर्वी वुहान विषाणू संस्था ही सार्स सीओव्ही २ या विषाणूवर संशोधन करीत होती याचे कुठलेही पुरावे नाहीत. वुहान संस्थेतून हा विषाणू सुटलेला नाही. सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणू हा प्राण्यांमधून माणसात पसरला असण्याची दाट शक्यता आहे. वन्य प्राण्यांच्या व्यापारात माणसांचा संबंध नेहमीच या विषाणूशी आलेला असू शकतो. सार्ससारख्याच करोना विषाणूचा प्रसार वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये झाला होता. सार्स सीओव्ही २ निसर्गातून माणसात कसा पसरला याचा अभ्यास करण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 virus is natural findings of global researchers akp
Show comments