ऑक्सफोर्ड विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार करोनामुळे लावलेल्या लॉकडाउनमुळे न्यूमोनिया, मेंदुज्वर आणि सेप्सिस (जखमेत पू होणे) सारख्या विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या कमी होणाच्यी शक्यता आहे. संसर्गजन्य रोगाचे तज्ज्ञ आणि क्राइस्टचर्चच्या ओटागो विद्यापीठाचे डीन प्रोफेसर डेव्हिड मर्डोक यांनी त्यांच्या अभ्यासातून ही माहिती दिली आहे. जागतिक लॉकडाऊनमुळे प्राणघातक अशा जीवाणूजन्य रोगांचा प्रसार कमी झाला असून त्यामुळे कोट्यावधी लोकांचे प्राण वाचू वाचले आहेत.
न्यूमोनिया, मेंदुज्वर यासारख्या आजारामुळे जगभरात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. विशेषत: मुले आणि वृद्धांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. करोना व्हायरस प्रमाणे या रोगांचे जंतू देखील श्वसनमार्गाद्वारे शरीरात जातात.
अभ्यासानुसार, २०१६ मध्ये जगभरात श्वसनाच्या विकारांचे ३३.६ कोटी रुग्ण आढळून आले आहेत. २४ लाख रुग्णांचा या आजारांमुळे मृत्यू झाला आहे. जानेवारी आणि मे २०२० मध्ये सर्वच देशांमध्ये या आजारांच्या रुग्णांची संख्या कमी झालेली दिसत आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलेनत प्रत्येक देशात जवळपास ६००० रुग्ण आढळून आले आहेत.
आक्रमक परंतु श्वसनामार्गे न होणाऱ्या आजारांचे प्रमाण कमी झालेले नाही. करोनाच्या काळातही या रोगांचा प्रसार कमी झालेला नाही असे अभ्यासामध्ये आढळले आहे.
करोनाकाळात लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे चार आठड्यांच्या आतच न्यूमोनियाच्या रुग्णांची संख्या ६७ टक्क्यांनी कमी झाली आहे. आठ आठवड्यापर्यंत ही स्थिती समान राहिली आहे. श्वसनाच्या जीवाणूंच्या संसर्गाचे प्रमाण कमी होण्याचे कारण हे वैद्यकीय सुविधांऐवजी लोकांचा एकमेकांसोबत कमी संपर्क आल्याने झाला आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे.
आणखी वाचा- लशींसाठी आपण राज्यांमध्ये स्पर्धा लावताय का?; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारलं
लॉकडाउनमुळे या रोगांचे प्रमाण जरी कमी झाले असले तरी समाजावर यामुळे ओझं येणार आहे. त्यामुळे त्याचा विचार करायला हवा असं अभ्यासकर्त्या अँजेला ब्रुगेमन यांनी म्हटले आहे. २६ देशांमधील राष्ट्रीय प्रयोगशाळांमधील माहितीचा अभ्यासकांनी अभ्यास केला आहे. त्यावरुन त्यांनी करोना काळात लावण्यात आलेल्या निर्बंधांचा देखील अभ्यास केला.