देशात करोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोविडचा सबव्हेरियंट असलेल्या BA.2.86 च्या जातीतील JN.1 चा विषाणू केरळच्या काही भागांमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे या विषाणूच्या संसर्गाची चिंता निर्माण झाली आहे. तसंच, हा विषाणू वेगाने पसरणारा असल्याचीही माहिती समोर आली आहे.

The India SARS-CoV-2 Genomics Consortium या प्रयोगशाळेने केरळमध्ये हा विषाणू शोधला आहे. INSACOG चे अध्यक्ष एन. के. अरोरा म्हणाले, हा विषाणू नोव्हेंबरमध्ये आढळला होता. हा विषाणू BA.2.86 चा उपप्रकार आहे. तसंच, JN.1 विषाणूचे काही बाधित रुग्णही केरळमध्ये सापडले आहेत.

yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Pimpri Chinchwad Anti Terrorism Branch exposed gang of fake police verification certificates
बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणार्‍या टोळीचा पर्दाफश
hundred liver transplants at New Era Hospital in nagpur
अवयव दानाला बळ… मध्य भारतातील एकाच रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाचे शतक
Nagpur Prostitution , college girls Prostitution Nagpur,
नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
deadly fight going on between two highly venomous snakes Everyone shuddered to see this scene
व्हिडिओ: अत्यंत विषारी मण्यार सापांची थरकाप उडवणारी झुंज

हा विषाणू वेगाने पसरू नये याकरता उपाययोजना आखण्यात आल्याने आतापर्यंत रुग्णालयात दाखल किंवा गंभीर आजारांची नोंद झाले नसल्याचं या संस्थेने नमूद केलं. तर, JN.1 हा विषाणू अमेरिकेत सप्टेंबर २०२३ मध्ये पहिल्यांदा आढळला होता.

नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क फोर्सचे सह अध्यक्ष राजीव जयदेवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सात महिन्यांच्या अंतरानंतर भारतात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढत आहेत. केरळमध्ये करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. परंतु, पूर्वीसारखी तीव्रता आताच्या प्रकरणांमध्ये नाही.

दरम्यान केरळमध्ये आढळून आलेल्या JN.1 विषाणू जलद पसरू शकतो आणि यामुळे रोग प्रतिकारशक्तीही कमी होऊ शकते. पूर्वीच्या प्रकारांपेक्षा हा विषाणू वेगळा आहे. पूर्वी करोनाची लागण झालेल्या आणि लसीकरण केलेल्या लोकांनाही या विषाणूची बाधा होऊ शकते, असंही जयदेवन यांनी स्पष्ट केलं.

JN.1 विषाणू पाश्चात्य देशांमध्ये वेगाने पसरत आहे. भारतातही आंतरराष्ट्रीय प्रवासी पर्यटन आणि कामाच्या निमित्ताने येत असतात. त्यामुळे हा विषाणू भारतातही वेगना पसरण्याची चिन्हे आहेत, असंही जयदेवन म्हणाले

Story img Loader