सध्या परिस्थितीमध्ये जगभरातील करोना लसींपैकी जवळजवळ सर्वच लसी या करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर परिणामकारक दिसत नाहीय. यासंदर्भातील माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे संसर्गजन्य रोगांच्या जाणकारांनी सांगितलं आहे. भविष्यामध्ये करोना विषाणूचे नवीन पद्धतीचे व्हेरिएंटही पहायला मिळतील. या व्हेरिएंटवर लस प्रभावी ठरणार नाही अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे जगभरामध्ये करोनाविरुद्ध लढ्यात लसीकरणाचा प्रधान्य दिलं जात असून जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्याचे सर्वच देश प्रयत्न करत आहेत.
नक्की वाचा >> “मी पैजेवर सांगायला तयार आहे की देशात तिसरी लाट येणार नाही”; दलाल स्ट्रीटच्या ‘वॉरेन बफेट’चा दावा
काय आहे म्हणणं?
सध्या लसीकरणामुळे करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी फायदा होत असला तरी सतत म्युटेड होत राहणाऱ्या करोना विषाणूच्या नव्या प्रकारांमुळे चिंतेत भर पडली आहे. या विषाणूमध्ये सतत होत राहणाऱ्या म्युटेशनमुळे खूप बदल झालेल्या विषाणूच्या प्रकारावर म्हणजेच कॉन्स्टीलेशन ऑफ म्युटेशन असणाऱ्या विषाणूवर लसीचा परिणाम होणार नाही, असं मत मारिया व्हॅन केर्कोव्ही यांनी व्यक्त केलं आहे. भविष्यात या विषाणूला म्युटेड होण्याची संधीच उपलब्ध होऊ न देण्यासंदर्भात संशोधन होणं गरजेचं असल्याचंही मारिया यांनी म्हटलंय.
नक्की वाचा >> उत्तर प्रदेशमधील करोना रुग्णांचे मृतदेह गंगेच्या पाण्यासोबत पश्चिम बंगालमध्ये येतात : ममता बॅनर्जी
डेल्टा व्हेरिएंट किती घातक?
डेल्टा व्हेरिएंट किंवा बी.१.६१७.२ व्हेरिएटमुळेच भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम दिसून आल्याचं मानलं जात. आकडेवारीनुसार यूनायटेड किंग्डममध्ये सध्या तिसरी लाट आली असून त्यासाठी हा डेल्टा व्हेरिएंटच जबाबदार आहे. आता डेल्टा व्हेरिएंटमध्येही म्युटेशन होत असून त्याचे रुपांतर डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये झालं आहे. भारतामध्ये सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. करोनाच्या या उत्पपरिवर्तीत विषाणूचे म्हणजेच डेल्टा प्लसचे महाराष्ट्रामध्ये २१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी यात रत्नागिरी जिल्ह्य़ात नऊ, जळगाव जिल्हा सात, मुंबईत दोन, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी स्पष्ट केलं. केरळमध्येही डेल्टा व्हेरिएंटचे तीन रुग्ण आढळून आलेत.
समजून घ्या >> संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?
भारतातील लसी किती प्रभावी?
यापूर्वी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी आपल्या संशोधनाच्या प्राथमिक अहवालांमध्ये भारतात देण्यात येणाऱ्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसी या डेल्ट व्हेरिएंटविरोधात खूप कमी प्रमाणात अॅण्टीबॉडी निर्माण करतात. मात्र डेल्ट व्हेरिएंट सोडल्यास या लसी इतर व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं सांगण्यात आलेलं.
समजून घ्या >> ‘नेजल व्हॅक्सिन’ म्हणजे काय? लहान मुलांच्या लसीकरणात ती अधिक फायद्याची कशी ठरु शकते?
जगभरात सुरुय संशोधन
अनेक संशोधनांमध्ये नवी डेल्टा व्हेरिएंट हा लसींविरोधात जास्त प्रतिरोध करत असल्याचं दिसून आलं आहे. जूनच्या सुरुवातीला लॅन्सेच मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या ब्रिटनमधील एका संशोधनामध्ये डेल्टा, अल्फा (ब्रिटनमधील व्हेरिएंट) आणि बीटा (पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला) व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्यांमधील अॅण्टीबॉडीज आणि लसीच्या माध्यमातून तयार झालेल्या अॅण्टीबॉडीज यासंदर्भात तुलनात्मक संशोधन करण्यात आलेलं. लस या व्हेरिएंटवर किती प्रभावी आहे याचा अभ्यास करण्यात येत आहे. सध्या जगभरामध्ये डेल्टा व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली जातेय.