चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने थैमान घातलं असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमुखांनी चिंता व्यक्त केली आहे. रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य संघटनेने चीनला सर्वाधिक फटका बसलेल्या ठिकाणी लसीकरण वाढवण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान चीनमध्ये मोठी रुग्णवाढ नोंदविणाऱ्या ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.७’ या उपप्रकाराचे भारतात तीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत गुजरातमध्ये दोन आणि ओदिशामध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“चीनमधील बदलती स्थिती आणि वाढत्या गंभीर आजारांमुळे जागतिक आरोग्य संघटनेला चिंता सतावत आहे,” असं WHO चे प्रमुख टेड्रोस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. यावेळी त्यांनी रोगाची तीव्रता, रुग्णालयात दाखल रुग्ण आणि उपाययोजना यासंबंधी सविस्तर माहिती देण्याचं आवाहन केलं.

Covid 19: …तर २० लाख लोकांचा मृत्यू होईल, चीनमध्ये करोनाने थैमान घातलं असताना रिपोर्टमधून धक्कादायक माहिती

“सर्वाधिक धोका असणाऱ्या लोकांचं लसीकरण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना चीनला मदत करत आहे. तसंच आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी आणि वैद्यकीय मदतीसाठी आम्ही त्यांना मदत करत राहू,” असं टेड्रोस यांनी सांगितलं आहे.

China Covid Cases: “लॉकडाउन विसरु नका”, अजित पवारांनी आठवण करुन दिल्यानंतर फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले “तुम्ही…”

चीनने २०२० पासून देशात कडक निर्बंधांचा भाग म्हणून ‘शून्य कोविड’ धोरण स्वीकारलं आहे. पण लोकांची वाढती नाराजी आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने सरकारने डिसेंबरच्या सुरुवातीला सूचना न देता अनेक निर्बंध शिथील केले होते. पण यानंतर रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.