गुजरातमध्ये तापी जिल्ह्यातील एका सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी गायीचं शेण आण्विक किरणोत्सारापासून बचाव करतं असं वक्तव्य केलं. गायांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या २२ वर्षीय आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावताना त्यांनी हे मत नोंदवलं. इतकंच नाही तर “गायीतून धर्माचा जन्म झाला, गोहत्या थांबली तर पृथ्वीवरील सर्व प्रश्न संपतील,” असंही त्यांनी म्हटलं.

न्यायाधीश व्यास म्हणाले, “रासायनिक शेतीपेक्षा सध्या शेणखताचा वापर करून होणारी शेती लोकप्रिय ठरत आहे. जैविक शेतीतून उत्पादन केलेल्या धान्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण मिळतं. विज्ञानाने हेही सिद्ध केलं आहे की, गायीच्या शेणापासून तयार केलेल्या घरात राहिलं तर आण्विक किरणोत्साराचाही परिणाम होत नाही.”

Dinesh Karthik pulls off one handed stunner catch for Paarl Royals against MI Cape Town in SA20 video viral
SA20 : वयाच्या ३९व्या वर्षीही दिनेश कार्तिकची जबरदस्त चपळाई! हवेत उडी मारत एका हाताने टिपला अप्रतिम झेल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bank mitra warn of agitation over low remuneration lack of protection of service
‘बँक मित्रां’चा आंदोलनाचा इशारा; तुटपुंजे मानधन, सेवाशर्तींचे संरक्षण नसल्याने त्रस्त
mumbai High Court ordered government to set up committee to consider phased ban on diesel and petrol vehicles
डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालणे शक्य? वायू प्रदूषण रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे न्यायालयाचे आदेश
mumbai High Court urged bmc and State Government to declare they are unable to solve illegal hawkers issue
…तर असमर्थ असल्याचे तरी जाहीर करा ! बेकायदा फेरीवाल्यांच्या समस्येवरून उच्च न्यायालयाचे महापालिका, सरकारला खडेबोल
thane police arrest
कल्याणमधील पत्रीपुलाजवळ प्रतिबंधित कोडीन औषधाच्या बाटल्या जप्त
nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
Meter inspector suspended in bribery case
पिंपरी : लाच प्रकरणातील मीटर निरीक्षक निलंबित

“गोमुत्र पिल्यास अनेक आजारही बरे होतात”

“गोमुत्र पिल्यास बरे न होणाऱ्या अनेक आजारही बरे होतात. गाय धर्माचं प्रतिक आहे,” असंही न्यायाधीश व्यास यांनी नमूद केलं.

“धर्माचा जन्म गायीतून झाला आहे”

व्यास पुढे म्हणाले, “धर्माचा जन्म गायीतून झाला आहे. कारण धर्म वृषभच्या रुपात आहे आणि गायीच्या मुलाला वृषभ म्हणतात.” यावेळी त्यांनी संस्कृतमधील एक श्लोक नमूद केला. यात म्हटलं आहे की, गायीचं अस्तित्व संपलं तर हे ब्रह्मांडही संपेल. वेदांच्या सर्व सहा भागाची निर्मिती गायीमुळे झाली आहे. त्यामुळे गोहत्या अस्वीकार्य आहे.”

“गोहत्येमुळे आजचे प्रश्न निर्माण झाले”

“स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अशावेळी केवळ गोहत्या बंदी झालेली नाही, तर गोहत्या सर्वात टोकाला पोहचली आहे. चिडचिड आणि संताप वाढत आहे त्यामुळे आजचे प्रश्न निर्माण झाले आहेत. यामागचं एकमेव कारण म्हणजे गोहत्या आहे. जोपर्यंत संपूर्णपणे गोहत्या बंद होत नाही, तोपर्यंत सात्विक जलवायूचा प्रभाव होणार नाही,” असंही न्यायाधीश व्यास यांनी नमूद केलं.

“जिथं गाय सुखी राहते तिथं धन आणि संपत्ती मिळते”

न्यायाधीश व्यास यांनी इतर दोन श्लोकांचाही उल्लेख केला. त्यात म्हटलं आहे, “जिथं गाय सुखी राहते तिथं धन आणि संपत्ती मिळते. जिथं गाय दुःखी आहे, तेथून धन आणि संपत्ती जाते. गाय रुद्राची आई, वसुची मुलगी, अदितीपुत्रांची बहिण आणि ध्रुरूप अमृताचा खजिना आहे.”

हेही वाचा : गुजरात दंगल आणि नरेंद्र मोदींवरील ‘बीबीसी’चा माहितीपट Youtube आणि ट्विटरवर ब्लॉक, केंद्राच्या आदेशानंतर कारवाई

“गायीच्या रक्ताचा एक थेंबही पृथ्वीवर पडणार नाही, त्या दिवशी पृथ्वीवरील सर्व प्रश्न संपतील”

“ज्या दिवशी गायीच्या रक्ताचा एक थेंबही पृथ्वीवर पडणार नाही, त्या दिवशी पृथ्वीवरील सर्व प्रश्न संपतील आणि पृथ्वीचं कल्याण होईल,” असंही नमूद करण्यात आलं.

नेमकं प्रकरण काय?

मोहम्मद आमीन आरिफ अंजुम नावाच्या व्यक्तीला जुलै २०२० मध्ये महाराष्ट्रातून एका ट्रकमधून १६ गायी आणि गोवंश घेऊन जाताना अटक झाली.

Story img Loader