दिल्लीत मंदिराशेजारी असलेल्या खुल्या जागेवर गोहत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आफताब अहमद उर्फ ​​लुकमन असं आरोपीचं नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून गोमांस जप्त केले असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – VIDEO : असदुद्दीन ओवेसींच्या दिल्लीतील घरावर दगडफेक; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ६ फेब्रुवारीच्या रात्री आरोपी आफताब त्याचे सहकारी अक्रम, सलीम, मारुफ, अलतामस यांच्याबरोबर गुलाबी बाग परिसरातून जात असताना त्यांना रस्त्यात एक गाय दिसली. त्यांनी गाईला पकडून जवळच असलेल्या खुल्या जागेवर नेले. तिथेच शेजारी मंदिरही होते. याठिकाणी गाईची हत्या करण्यात आली.

हेही वाचा – शिवजयंती साजरी करण्यावरून JNU मध्ये राडा; शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचा अभाविपचा आरोप

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गोमांस जप्त केले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून २२ वर्षीय आफताबला अटक करण्यात आली आहे. तो गोमांस विक्री करत असल्याचा खुलासा त्यांने पोलीस चौकशीदरम्यान केला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. तसेच या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे रोहिणी येथील गोहत्या प्रकरणातही या आरोपींचा समावेश असल्याचं पुढं आलं आहे.