झारखंडमध्ये सीपीआय (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) नेते बालेश्वर महतो यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची हत्या करण्यात आली. महतो हे दुर्गापूजा आटोपून आपल्या घरी परतत असताना त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.
55 वर्षीय महतो हे दुर्गापूजा आटोपून आपल्या घरी परतत होते. लइयो चौक येथील आपल्या घराजवळ आले असतानाच दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. त्यानंतर जमिनीवर पडलेल्या महतो यांना स्थानिकांनी रामगड येथील रुग्णालयात दाखल केले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. महतो यांची हत्या कशासाठी करण्यात आली याबाबत अद्याप काहीही माहिती नाही, पोलिस आरोपींचा आणि या हत्येमागील कारणाचा शोध घेत आहेत.