CPI(M) General Secretary Sitaram Yechury Passes Away: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र, गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७२ वर्षांचे होते. श्वसन मार्गात जंतूसंसर्ग झाल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज त्यांचं उपचारांदरम्यान निधन झालं.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती देण्या आली आहे. यानुसार, आज दुपारी ३ वाजून ३ मिनिटांनी सीताराम येचुरी यांचं निधन झालं. श्वसनमार्गात जंतूसंसर्ग झाल्यामुळे आणखीन क्लिष्ट अशा व्याधी निर्माण झाल्या होत्या, असंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. “कॉमरेड येचुरी यांच्यावर सर्वोत्तम उपचार आणि त्यांची चांगली काळजी घेतल्याबद्दल आम्ही एम्सचे डॉक्टर, नर्स आणि संचालकांचे आभार मानतो. त्यांच्या अंत्यसंस्काराची वेळ व इतर तपशील लवकरच कळवण्यात येतील”, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
After the death of Dr Subhash Chaudhary his family has no maintenance fund and other financial benefits Nagpur news
दिवंगत कुलगुरूंच्या कुटुंबावर आर्थिक संकट, निधनाच्या तीन महिन्यानंतरही …
S M krushna
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Raghunath More, Raghunath More passed away,
शिवसेनेचे रघुनाथ मोरे यांचे निधन, दिघे यांच्या निधनानंतर साभांळली होती ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी
Cement mixer operator died, Metro 9,
मेट्रो ९ च्या कामादरम्यान सिमेंट मिक्सर ऑपरेटरचा मृत्यू, कंत्राटदार आणि सल्लागारास मोठा दंड, चौकशीसाठी समिती स्थापन

राहुल गांधींनी व्यक्त केला शोक

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सीताराम येचुरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “सीताराम येचुरी माझे चांगले मित्र होते. आपल्या देशाबद्दल त्यांना सखोल अशी समज होती. इंडिया या कल्पनेचे ते खंदे पुरस्कर्ते होते. आमच्या होणाऱ्या प्रदीर्घ चर्चा माझ्या कायम स्मरणात राहतील. या कठीण प्रसंगी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व कार्यकर्त्यांसोबत माझ्या सद्भावना आहेत”, अशी पोस्ट राहुल गांधींनी एक्स अकाऊंटवर केली आहे.

Who was CPI(M) General Secretary Sitaram Yechury in marathi
डाव्या चळवळीतील एक सामान्य कार्यकर्ता ते सर्वोच्च नेता, असा सीताराम येचुरी यांचा प्रवास होता. (Photo – ANI)

सीताराम येचुरी यांची राजकीय कारकिर्द

सीताराम येचुरी हे भारताच्या डाव्या विचारप्रवाहातील एक महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित, कामगार व मागास वर्गाच्या हक्कांसाठीची अनेक आंदोलनं झाली. माकपचे नेते व खासदार म्हणूनही त्यांनी संसदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारला परखड शब्दांत जाब विचारला होता.

Sitaram Yechury: सीताराम येचुरी कोण होते? डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते, भाजपा-संघाचे कडवे टीकाकार काळाच्या पडद्याआड

सीताराम येचुरी यांनी १९७४ साली स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआयमध्ये प्रवेश केला. एका वर्षातच ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यदेखील झाले. १९७५ साली जेएनयूमध्ये असतानाच त्यांना आणीबाणीच्या काळात अटक झाली. १९७७-७८मध्ये ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही निवडून आले होते. प्रकाश करात यांच्यासह सीताराम येचुरी यांनी त्या काळात जेएनयूमधील डाव्या विचारप्रवाहाचं नेतृत्व केल्याचं मानलं जातं.

Sitaram Yechury: ‘राजा-प्रजा’ प्रथेकडे आपला उलटा प्रवास – सीताराम येचुरी

१९८४ साली सीताराम येचुरी माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य झाले. पॉलिट ब्युरोमध्ये त्यांचा प्रवेश झाला. २०१५ साली ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव म्हणून नियुक्त झाले. यादरम्यान त्यांनी तब्बल १२ वर्षं राज्यसभेत खासदार म्हणून काम केलं. या काळात त्यांनी कामगार, मागासवर्ग, मध्यमवर्ग यांचे अधिकार यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडल्या.

Story img Loader