सत्तेसाठी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने माओवाद्यांशी हातमिळवणी करून आपल्या हत्येचा कट रचल्याचा सनसनाटी आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात सीमेलगतच्या बोनगाव येथे बोलताना त्यांनी माकपला टीकेचे लक्ष्य केले. कामदुनी खेडय़ात सोमवारी आपल्या भेटीवेळी हा हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. बलात्कारीत मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ममता त्या गावात गेल्या होत्या. त्यावेळी बाहेरून आलेल्या काही व्यक्तींकडून आपल्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितल्याचा दावा ममतांनी केला.

Story img Loader