पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी नक्षलवाद्यांच्या साथीने माझी हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केली. पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना बॅनर्जी यांनी राज्यातील प्रमुख विरोधक कम्युनिस्ट पक्षाला लक्ष केले.
माझ्या हत्येचा कट रचण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी नक्षलवाद्यांसोबत हातमिळवणी केली आहे. त्यानंतर पुन्हा सत्तेत येण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. मात्र, ते कधीच घडणार नाही, असा हल्ला बॅनर्जी यांनी केला. कामदुनी गावातील पीडित मुलीला भेटण्यासाठी मी सोमवारी तिथे गेले होते. त्यावेळीच मला मारण्याचा कट होता. त्यासाठी गावाबाहेरील अनेकजण त्या दिवशी गावात आले होते. गावातून परतल्यानंतर मला माझ्या सुरक्षारक्षकांनी माझी हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता, असे सांगितले. गुप्तचर विभागानेही माझ्या जीवाला धोका असल्याचा अहवाल दिला आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा