नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल (दि. १५ जानेवारी) येती एअरलाईन्स एअरक्राफ्ट या कंपनीच्या विमानाला मोठा अपघात झाला. विमानात असलेल्या सर्व ७२ लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. आता या विमानाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोखरा येथे भस्मसात झालेलं 9N – ANC ATR 72 हे विमान कधीकाळी भारतीय उद्योगपती आणि कर्ज बुडवून परदेशी पळालेल्या विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सकडे होतं. विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्स ही कंपनीने २००७ साली फ्रेंच-इटालियन विमान उत्पादक कंपनी ATR कडून विकत घेतलं होतं. सीरम फ्लिट्स डेटा या वेबसाईटने ही माहिती दिली आहे. सीरम फ्लिट्स डेटा ही कंपनी विमानांची माहिती, विमानांचे साहित्य आणि त्यांची किंमत याचे विश्लेषण करण्याचे काम करते.

हे वाचा >> यशस्वी लँडिंगनंतर अंजू मुख्य पायलट बनणार होती; १६ वर्षांपूर्वी पतीचेही विमान अपघातात निधन, आता अंजूचा मृत्यू

२००७ ते २०१३ पर्यंत किंगफिशरने उडवलं विमान

ATR कंपनीच्या ७५४ क्रमांक असलेलं हे विजय मल्ल्याने घेतल्यानंतर त्याला VT – KAJ असे नाव देण्यात आले होते. ३० मार्च २०१३ पर्यंत किंगफिशर कंपनीने हे विमान वापरले. या काळात या विमानाने अनेकदा उड्डाण घेतलं. विजय मल्ल्याने आर्थिक नियमितता केल्याप्रकरणी किंगफिशर कंपनीला टाळे ठोकावे लागले. एप्रिल २०१३ साली थायलंडच्या नोक एअर (Nok Air) या कंपनीने हे विमान खरेदी केले. नोक एअरने देखील २०१३ पासून २०१९ पर्यंत विमान वापरले. नोक एअरने पुन्हा विमान नेपाळच्या येती एअरलाईन्स एअरक्राफ्टला (Yeti Airlines) २०१९ मध्ये विकले. येती एअरलाईन्स कंपनी लेझर इनव्हेस्टेक बँक आणि केएफ टर्बो लिजिंग या दोन कंपन्यांच्या मालकीची आहे.

हे वाचा >> Nepal Plane Crash: “शेवटच्या क्षणी प्लॅन बदलला आणि…”, त्या चार भारतीय तरुणांची करुण कहाणी

ATR 72 या विमानात दोन इंजिन होते. कमी अंतराच्या प्रवासासाठी हे विमान बनविण्यात आले होते. फ्रान्स आणि इटलीची विमान निर्मिती करणारी कंपनी एटीआरने हे विमान बनविले होते. नेपाळच्या इतिहासात पहिल्यांदाच एटीआर कंपनीच्या विमानाला एवढा भीषण अपघात झाला आहे. अपघात झालेल्या ठिकाणी विमानाचा ब्लॅक बॉक्स आढळून आलेला आहे. याच्या आधारे पुढील माहिती गोळा करण्याचे काम केले जाईल.

Story img Loader