Cricketer Mohammed Shami Maha Kumbh Dip Video: महाकुंभमेळ्यात अनेक सेलिब्रिटी, खेळाडू, राजकारणी आणि सामान्यांनी सहभाग घेतला असून त्रिवेणी संगमावर स्नान केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज विधानसभेत बोलत असताना क्रिकेटपटू मोहम्मद शमीनेही महाकुंभदरम्यान स्नान केले असल्याचे सभागृहात म्हटले. यानंतर आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगींना टोला लगावला आहे. तुम्ही क्रिकेटपटूचे नावही बदलले का? असा सवाल अखिलेश यादव यांनी एक्स पोस्टद्वारे विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभेत बोलत असताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “महाकुंभमेळ्यात कोणत्याही भाविकाबरोबर भेदभाव झालेला नाही. क्रिकेटपटू मोहम्मद शमीनेही महाकुंभ दरम्यान अमृतस्नान केले आहे.”

योगी आदित्यनाथ यांनी दावा केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण मोहम्मद शमीने महाकुंभमेळ्यात हजेरी लावली की नाही? याबाबत कोणतीही खात्रीलायक माहिती समोर आलेली नाही. त्यामुळेच अखिलेश यादव यांनी क्रिकेटपटूचेही नाव तुम्ही बदलले का? असा टोला लगावला.

योगी आदित्यनाथ २०१७ साली सत्तेत आल्यानंतर त्यांनी मुघल आणि ब्रिटिश काळातील अनेक शहरांची आणि रेल्वे स्थानकाची नावे बदलली आहेत. अलाहाबाद, फैझाबाद या जिल्ह्यांची नावे आतापर्यंत बदलली गेली आहेत.

मोहम्मद कैफच्या व्हिडीओचा संदर्भ

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संदर्भ देताना कदाचित तो मोहम्मद कैफचा दिला असावा, असा अंदाज काही युजर्स व्यक्त करत आहेत. महाकुंभमेळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे १३ जानेवारी रोजी मोहम्मद कैफने प्रयागराज येथील यमुना नदीत पोहण्याचा आनंद घेतला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो महाकुंभमधील असल्याचे बोलले गेले.

माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने यमुनामधील व्हिडीओ पोस्ट करताना म्हटले होते की, मी याच यमुना नदीत पोहायला शिकलो होतो. मोहम्मद कैफ हा मुळचा प्रयागराज येथील आहे.

Live Updates