आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगचे आरोपी क्रिकेटपटू एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांना दिल्लीतील विशेष न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. या दोघांसह एकूण १८ जणांना जामीन मंजूर करण्यात आला.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱया या क्रिकेटपटूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना १६ मे रोजी मुंबईमधून अटक केली होती. या दोघांसह अजित चंडिला यालाही पोलिसांनी अटक केली होती. मात्र, त्याने जामीनासाठी अर्ज केलेला नसल्यामुळे त्याला अजून जामीन मिळालेला नाही. श्रीशांत, चंडिला आणि चव्हाण यांच्यावर पोलिसांनी मोक्का कायद्यानुसारही गुन्हे दाखल केले आहेत.

Story img Loader