Crime News : सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहितेने लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच आयुष्य संपवलं आहे. हुंड्यासाठी होणारा छळ सहन झाल्याने देविका नावाच्या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या ( Crime News ) केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले आणि तिचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो त्यांनी शवविच्छेदनासाठी पाठवला. तेलंगणातल्या हैदराबाद या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हैदराबाद पोलिसांनी या घटनेबाबत नेमकं काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा महिन्यांपूर्वी गोवा या राज्यात देविकाचं लग्न सतीश या तरुणाशी झालं. सतीशही सॉफ्टवेअर इंजिनिअरच आहे. देविकाच्या घरातल्यांनी लग्न अत्यंत थाटामाटात करुन दिलं. मात्र जेव्हा ती लग्न करुन पती सतीशसह हैदराबादला आली तेव्हा हुंड्यासाठी तिचा छळ सुरु झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुंड्यासाठी वाढत असलेला छळ सहन न झाल्याने देविकाने गळफास ( Crime News ) घेऊन आयुष्य संपवलं. देविकाच्या मृत्यूची बातमी मिळताच तिच्या घरातल्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. देविकाने रविवारी रात्री उशिरा घरातल्या पंख्याला गळफास घेतला. तिचा तिच्या सासरी शारिरीक आणि मानसिक छळ चालला होता असा आरोप तिच्या आईने केला आहे. हैदराबादच्या प्रशांती हिल्स या ठिकाणी ही घटना घडली.

देविकाच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत काय म्हटलं आहे?

देविकाची आई रमालक्ष्मी यांनी पोलिसात जी तक्रार दाखल केली त्यात असा आरोप केला आहे की त्यांचा जावई सतीश त्यांच्या मुलीला म्हणजेच देविकाला हुंडा आणण्यासाठी छळत होता. तिचा रोज शारिरीक आणि मानसिक छळ होत होता. रैदुर्गम पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली आहे. तसंच या प्रकरणाचा पुढील तपासही सुरु केला आहे. देविकाचा मृतदेह ( Crime News ) ओस्मानिया रुग्णालयात पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

देविका आणि सतीश यांचा प्रेमविवाह झाल्याची माहितीही समोर

समोर आलेल्या माहितीनुसार देविका आणि सतीश हे दोघंही एकाच कंपनीत काम करत होते. या दोघांची भेट पहिल्यांदा याच कंपनीत झाली. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांच्या कुटुंबियांच्या सहमतीने दोघांचं लग्न गेल्या वर्षी गोवा या ठिकाणी करण्यात आलं. रविवारी रात्री देविका आणि सतीश यांच्यात वाद झाला. त्यानंतर देविका तिच्या खोलीत गेली आणि तिने दार लावून घेतलं. सतीशने दरवाजा ठोठावला पण देविकाने दरवाजा उघडला नाही. त्याला वाटलं की सकाळी ती बाहेर येईल. पण सकाळीही तिने दरवाजा ठोठावल्यावर काहीही प्रतिसाद दिला नाही ज्यानंतर सतीशने दरवाजा तोडला. त्यावेळी पंख्याला लटकत असलेला देविकाचा मृतदेह ( Crime News ) त्याला दिसला. ज्यानंतर त्याने पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.