Crime News वीज बिल कमी करायचं असेल तर तुझ्या सुंदर पत्नीला माझ्याकडे पाठव अशी ऑफरच एका वीज नियामक मंडळात काम करणाऱ्या अभियंत्याने शेतकऱ्याला दिली आहे. या संदर्भातला व्हिडीओ समोर आला आहे. वीज बिल कमी करुन देण्याच्या बदल्यात कनिष्ठ अभियंत्याने पत्नीला घेऊन येण्यास सांगितलं असा हा व्हिडीओ आहे. उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमधली ही घटना आहे. शेतकऱ्याने वीज बिल कमी करण्यासाठी अभियंताने काय सांगितलं? पत्नीबद्दल काय उद्गार काढले ते या व्हिडीओत सांगितलं आहे.
नेमकी काय घटना घडली?
बाराबंकी येथील शेतकऱ्याने मुख्यमंत्री पोर्टलद्वारे मध्यांचल विद्युत विभागाच्या एमडींकडे तक्रार केली होती. १३ मार्च २०२४ रोजी तपासणीदरम्यान जेई प्रदीप कुमार घरी पोहोचले होता. त्यादरम्यान त्याची नजर शेतकऱ्याच्या पत्नीवर पडली. यानंतर अभियंता प्रदीप म्हणाला की, “तुझी पत्नी खूप सुंदर आहे, तुझे वीज कमी करायचं असेल, तर तुझ्या पत्नीला माझ्याकडे घेऊन ये.” शेतकऱ्याने सांगितले की, काही दिवसांनी अचानक वीज बिल जास्त आले. त्याला ९४ हजार ४८४ रुपये वीज बिल पाठवल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. वीज जोडणीवर चुकीचे रीडिंग देऊन अभियंता प्रदीप याने जाणीवपूर्वक बिल वाढवले आणि नंतर कनेक्शन तोडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर ते बिल दुरुस्त करण्यासाठी जेईकडे गेले असता त्याने पत्नीला घेऊन येण्याची ऑफर दिली असं या शेतकऱ्याने सांगितलं आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सदर शेतकरी अभियंत्याने त्याच्या पत्नीबाबत काय उद्गार काढले ते सविस्तर सांगताना दिसतो आहे. एक्स या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरु
३१ जानेवारी २०२५ रोजी तो शेतकरी बिल दुरुस्त करण्यासाठी पुन्हा अभियंता कार्यालयात गेला. पण यावेळी पुन्हा जेईने आपल्या पूर्वीच्या मुद्याचा पुनरुच्चार केला आणि म्हटले, वीज बिलासाठी चकरा मारून थकला असशील, आता ४० हजार रुपये आणि तुमची पत्नी सोबत आणा, मग मी वीज बिल व्यवस्थित नियमित होईल. कनिष्ठ अभियंता प्रदीपने हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या प्रकरणाची तक्रार अधिकाऱ्यांकडे केली असून आरोप खरे असतील तर पुरावे सादर करावेत, असे सांगितले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दैनिक भास्करने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.