दोन आदिवासी महिलांना धर्मांतराच्या संशयावरुन खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली. या घटनेचे राजकीय पडसाद उमटण्यास झाले आहेत.

कुठे घडली ही घटना?

ओडिशा येथील बालासोर या ठिकाणी ही घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पितांबर बिस्वाल, प्रसंता कुमार नायक, जयंता कुमार नायक आणि बादल कुमार पांडा अशा चार जणांना अटक केली आहे. दोन महिला या बळजबरीने धर्मांतर करत आहेत असा आरोप त्यांच्यावर झाला होता. बालासोरच्या रेमुना पोलीस ठाण्याच्या हद्दीत छनखानपूर गावात ही घटना घडली होती. त्यानंतर या दोन महिलांना खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर ही मारहाण करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली.

Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक मालकाने सांगितली नेमकी परिस्थिती
Koregaon Bhima Shaurya Din
Koregaon Bhima Shaurya Din: महार रेजिमेंट आणि कोरेगाव विजय…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Jaisalmer Tubewell Water Burst
Jaisalmer Tubewell Water Burst Video : जैसलमेरमध्ये जमिनीतून उसळला पाण्याचा फवारा, लोकांमध्ये घबराट; सरस्वती नदीशी काही संबंध आहे का? तज्ज्ञ म्हणाले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!

हे पण वाचा- नागपूर की मिर्झापूर… गृहमंत्र्याच्या शहरात वर्षभरात ९० हत्या, महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ

पोलिसांनी काय सांगितलं?

आम्हाला जेव्हा ही घटना समजली तेव्हा आम्ही त्या ठिकाणी जाऊन महिलांची सुटका केली. आम्ही आता यापुढची कारवाई करतो आहोत. अशी माहिती बालासोरचे डीआयजी सत्यजीत नाईक यांनी दिली आहे. या प्रकरणातल्या पीडित महिलांनी चार जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे आम्ही ती तक्रार दाखल करुन घेतली आहे. दरम्यान ज्या चारजणांना अटक करण्यात आली आहे त्यापैकी बादल कुमार पांडाने या दोन महिलांच्या विरोधातही तक्रार केली आहे.

दोन महिलांवर गुन्हा दाखल

बादल कुमार पांडा यांच्या तक्रारीनंतर सदर दोन महिलांवर धार्मिक स्वातंत्र्य कायदा १९६७ च्या कलम ४ आणि कलम २९९ यांच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१ च्या अनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात पोलिसांनी आणखी १० ते १५ जणांवरही गुन्हा दाखल केला आहे. पांडा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे की छनखानपूर या ठिकाणी असलेल्या गावातील लोकांना या महिला जबरदस्तीने धर्मांतर करण्यास सांगत होत्या. गावातल्या रहिवाशांनी त्यांना असं करण्यापासून रोखलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजूच्या जबान्या नोंदवून घेतल्या आहेत. पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

Story img Loader