Crime News : २० वर्षांपासून बंद असलेल्या एका घरातल्या फ्रिजमध्ये एका आवरणात गुंडाळून ठेवलेली कवटी आणि मानवी सांगाडा सापडला आहे. हे घर २० वर्षांपासून बंद होतं. आता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. केरळमधल्या कोच्ची या ठिकाणी एका गावात ही घटना समोर आली आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घरामध्ये काही बेकायदेशीर गोष्टी घडत आहेत अशी माहिती त्यांना मिळाली. ज्यानंतर त्यांनी या घरावर छापा मारला आणि तपास केला. त्यावेळी पोलिसांना फ्रिजमध्ये एक सांगाडा आणि कवटी आढळून आली. हा संपूर्ण सांगाडा नेमका कुणाचा आहे? याचा शोध आता पोलीस घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या २० वर्षांपासून हा सांगाडा फ्रिजमध्ये होता. हत्या करुन हा सांगाडा या ठिकाणी ठेवण्यात आला असावा असा कयास आहे.

Donald Trump
Donald Trump : आम्हीच अमेरिकेतली काही राज्ये विकत घेतो! कॅनडाच्या नेत्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनाच दिली ऑफर
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Billeshwar Mahadev temple UP Unnao
Mahabharata era Shivling damaged: महाभारतकालीन शिवलिंगाची विटंबना; अटक केलेल्या आरोपीनं सांगितलं धक्कादायक कारण
Tirupati stampede
Tirupati stampede : तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू
Viral Video
गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी १२ गाड्यांचा ताफा घेऊन निघाला गँगस्टर, Video Viral होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Top 10 richest people in India as of January 2025
Top 10 richest people in India : मुकेश अंबानी ते डी मार्टचे संस्थापक…जानेवारी २०२५ पर्यंत ‘हे’ आहेत देशातील टॉप १० सर्वात श्रीमंत व्यक्ती; वाचा यादी
Kangana Ranaut and Priyanka Gandhi vadra
‘तुम्ही माझा Emergency चित्रपट नक्की पाहा’, कंगना रणौत यांच्या आग्रहानंतर प्रियांका गांधींनी दिलं ‘असं’ उत्तर
Sarangi Mahajan Serious Allegations on Dhananjay and Pankaja Munde
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप, “धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडप केली, वाल्मिक कराड…”

या प्रकरणात डॉक्टरांची होणार चौकशी

केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोच्ची येथील छोट्टानिकारा भागातल्या एरुवेली पॅले स्क्वेअरच्या जवळ १२ एकरची ही मालमत्ता आहे. ही मालमत्ता डॉ. मंगलास्सेरी फिलिप जॉन यांची आहे. डॉक्टर अनेक वर्षांपासून कोच्ची या शहरात राहतात. या घरात सांगाडा सापडल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांना संपर्क केला. तसंच फॉरेन्सिक टीमलाही या ठिकाणी बोलवण्यात आलं. हत्या केल्यानंतर तो मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला गेला असावा का? हेदेखील पोलीस तपासत आहेत. तसंच डॉक्टर जॉन हे काही संशयास्पदरित्या गायब झालेले नाहीत. मात्र त्यांनाही याबाबत विचारणा करण्यात येणार आहे. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.

सांगाडा आणि कवटी पाहून सरपंचांनाही भीती वाटली

पोलिसांनी या कवटी आणि सांगाडा मिळाल्याची माहिती गावाच्या सरपंचांना दिली. सरपंचांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि त्यांनाही भीती वाटली. जो सांगाडा मिळाला आहे तो ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी पाहिला ते देखील गर्भगळित झाले. जो सांगाडा मिळाला तो कुणाचा आहे? साधारण किती वयाच्या माणसाचा आहे? या सगळ्या गोष्टींची माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगाड्याची मणक्याची हाडं आणि इतर हाडं अजूनही शाबूत आहे. आता फॉरेन्सिक टीम त्याबाबत तपास करते आहे. पोलिसांनी हा सगळा परिसर आणि ज्या घरात सांगाडा तसंच कवटी मिळाली ते घर सील केलं आहे. हे घर २० वर्षांपासून रिकामंच आहे तसंच या घरात काही लोक लपून छपून बेकायदेशीर कारवाया करत होते. त्यामुळे पोलिसांनी छापा मारला. आता या प्रकरणात पोलीस गावातल्या लोकांकडेही याबाबत विचारणा करत आहेत.

Story img Loader