Crime News : एका महिलेने प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची हत्या केली. त्यानंतर पतीच्या मृतदेहाच्या खिशात व्हायग्राचे आठ रॅपर ठेवले आणि या गोळ्यांच्या अतिसेवनाने पतीचा मृत्यू झाला असा बनाव रचला. पोलिसांना सुरुवातीला हा बनाव आहे असं वाटलं नाही. महिला खरं बोलत असावी असं सुरुवातीला पोलिसांना वाटलं. पण जेव्हा शवविच्छेदन अहवाल आला तेव्हा सत्य समोर आलं. ही घटना नेमकी काय? कुठे घडली ते आपण जाणून घेऊ.

कुठे घडली घटना पोलिसांनी काय सांगितलं?

पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची ही घटना कानपूर येथील आहे. कानपूरमध्ये आबिद अली नावाचा एक माणूस त्याची पत्नी शबानासह आणि त्यांच्या मुलासह राहात होता. १९ जानेवारीला शबानाने पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना सांगितलं की व्हायग्राच्या ओव्हरडोसमुळे पतीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह तपासला तेव्हा मृत आबिदच्या खिशात त्यांना शक्तिवर्धक गोळ्यांचे आठ रॅपर मिळाले. तसंच आबिदच्या शरीरावर जखम, वार अशा कुठल्याही खुणा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनाही हेच वाटलं की शबाना म्हणजेच आबिदची पत्नी खरं बोलते आहे. पतीच्या मृत्यूनंतर शबाना खूप रडत होती हेदेखील पोलिसांनी पाहिलं. त्यामुळे पोलिसांना हेदेखील वाटलं की तिला खूप दुःख झालं आहे. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन झाल्यानंतर आबिदचा मृतदेह कुटुंबाला देण्यात आला, त्याच्या पार्थिवावार अंत्यसंस्कारही करण्यात आले. मात्र शवविच्छेदन अहवाल आला तेव्हा आबिदचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचं कारण समोर आलं.

पोलिसांनी तपास सुरु केला आणि…

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला तेव्हा शबानाचा भाऊ सलीमने पोलिसांना सांगितलं की आबिदची हत्या झालेली असू सकते. तसंच या हत्येत शबानाला कुणीतरी साथ दिली असावी. त्यानंतर पोलिसांनी शबानाला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी सुरु केली. तिचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यावेळी पोलिसांना कळलं की रेहान नावाच्या युवकाशी ती बोलली होती. आबिदचा मृत्यू झाला तेव्हाही या दोघांचं बोलणं झालं होतं. पोलिसांनी यानंतर रेहानलाही ताब्यात घेतलं. दोघांची कसून चौकशी झाली तेव्हा या दोघांनीही आबिदला ठार केल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली. आज तकने हे वृत्त दिलं आहे.

रेहान आणि शबाना यांची ओळख सोशल मीडिायवर झाली आणि प्रेमसंबंध निर्माण झाले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शबाना आणि रेहान यांच्यात मागच्या वर्षभरापासून सोशल मीडियावर मैत्री झाली होती. रेहान उन्नावच्या बांगरमऊ येथील रहिवासी आहे. आबिद घरी नसताना तो शबानाला भेटायला येत असे. या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. ज्याबाबत आबिदलाही संशय आला. त्यानंतर आबिद आणि शबाना यांच्यात वाद सुरु झाले. या वादांना कंटाळून शबाना आणि रेहान यांनी आबिदला आपल्या मार्गातून हटवण्याचा कट रचला. ज्या दिवशी आबिदची हत्या झाली त्यादिवशी शबानाने रेहान आणि त्याचा आणखी एक मित्र विकास यांना घरी बोलवलं होतं. या तिघांनी गळा दाबून आबिदची हत्या केली. त्यानंतर आबिदच्या खिशात शबानाने शक्तीवर्धक गोळ्यांचे रॅपर ठेवले. तसंच ही हत्या नसून त्याचा मृत्यू ओव्हरडोसने झाला आहे असा बनाव रचला. पोलिसांनी या हत्या प्रकरणात शबाना आणि तिचा प्रियकर रेहान या दोघांनाही अटक केली आहे.

Story img Loader