Crime News : २५ वर्षांच्या एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना मागील आठवड्यात उघडकीस आली. विवाहितेच्या मृत्यू प्रकरणात तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. या महिलेचा पती आणि तिच्या सासरचे लोक तिचा छळ कसा करत होते यासंदर्भातली माहिती आता समोर आली आहे. केरळमधल्या मल्लपुरम येथील ही घटना आहे. पोलिसांनी या प्रकरणात महिलेच्या पतीला म्हणजेच प्रभीनला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकी घटना काय घडली?

विष्णुजा आणि प्रभीन या दोघांचा विवाह मे २०२३ मध्ये झाला. हा विवाह म्हणजे प्रेमविवाह वगैरे नव्हता. पाहण्याचा कार्यक्रम करुन रिसतर बोलणी करुन झालेला हा विवाह होता. लग्नानंतर प्रभीनने विष्णुजाचा छळ ( Crime News ) करण्यास सुरुवात केली. तो तिला सांगायचा तू दिसायला अजिबात चांगली नाहीस. तसंच तुला नोकरी का मिळत नाही? असंही तो सातत्याने विचारायचा आणि तिचा अपमान करायचा. विष्णुजाच्या माहेरच्या लोकांनी असाही आरोप केला आहे की प्रभीन तिला मारहाण करायचा. केरळच्या मल्लपुरममध्ये ही घटना घडली. या विवाहितेचा मृतदेह तिच्याच घरात गेल्या आठवड्यात आढळून आला.

विष्णुजाच्या वडिलांनी काय सांगितलं?

विष्णुजाच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं, “प्रभीन माझ्या मुलीला कायम सांगायचा तू सडपातळ दिसली पाहिजेस. एवढंच नाही तर तो तिला कधी मोटरसायकलवर बसवूनही फिरायला न्यायचा नाही. तू दिसायला आकर्षक नाहीस, मी तुला बाहेर घेऊन जाणार नाहीस असं तिला सांगायचा. तू नोकरी कर आणि पैसे कमवून मला दे असंही तिला सांगायचा. तिने काही ठिकाणी मुलाखती दिल्या, परीक्षा दिल्या पण तिला नोकरी मिळाली नाही. तिने तिच्या परिने पूर्ण प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. त्यावरुनही तो प्रभीन तिचा मानसिक छळ करत होता. एवढा छळ होऊनही आमच्या मुलीने कधीही याबाबत कल्पना दिली नाही.” वासुदेवन यांनी साश्रू नयनांनी ही बाब माध्यमांना सांगितली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. तसंच हे सगळं आम्हाला तिच्या मैत्रिणींकडून समजलं असंही वासुदेवन यांनी सांगितलं.

प्रभीनने माझ्या मुलीला ठार केलं, विष्णुजाच्या वडिलांचा आरोप

विष्णुजाचे वडील म्हणाले, विष्णुजाचा मृत्यू झालेला नाही तिची हत्या ( Crime News ) झाली आहे. मला याची पूर्ण खात्री आहे की प्रभीनने तिला फासावर लटकवलं आहे. ती इतका छळ सहन करत होती पण तिने कधीही आम्हाला याबाबत कल्पना दिली नाही. ती नेमकी कोणत्या परिस्थितीतून जाते आहे हे तिने आम्हाला कळू दिलं नाही. मला असंही कळलं की प्रभीन तिला मारहाण करत होता आणि तिचा मानसिक आणि शारिरीक छळ करत होता. प्रभीन आणि त्याच्या कुटुंबाने आमच्या मुलीचा म्हणजेच विष्णुजाचा छळ ( Crime News ) केला असंही तिच्या कुटुंबाने म्हटलं आहे. तसंच प्रभीनचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते अशीही माहिती मी ऐकली आहे असाही आरोप ( Crime News ) वासुदेवन यांनी केला.

विष्णुजाच्या मैत्रिणीने काय सांगितलं?

विष्णुजाच्या एका मैत्रिणीने सांगितलं की विष्णुजाचं व्हॉट्स अॅप प्रभीनच्या मोबाइल फोनशी जोडलेलं होतं. तो तिचे चॅट्सही तपासत होता. त्यामुळे ती व्हॉट्स अॅपवर मोकळेपणाने बोलत नव्हती. इतकंच नाही तर प्रभीन रोज तिचा शारिरीक आणि मानसिक छळ करत होता. परिस्थिती जेव्हा तिच्या हाताबाहेर गेली तेव्हा ती मला काय काय व्हायचं ते सांगू लागली होती. आम्ही दोघी टेलिग्रामवर एकमेकींशी बोलायचो असंही तिच्या मैत्रिणीने सांगितलं.