दिल्लीतील सामूहिक बलात्कारातील पीडित २३ वर्षीय मृत तरुणीची ओळख दर्शवणारी माहिती प्रसिद्ध केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका इंग्रजी दैनिकाविरोधात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.
बलात्कारित पीडिताची माहिती प्रसिद्ध केल्याच्या गुन्ह्य़ासाठी कलम २२८- ए नुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यानुसार वसंत विहार पोलीस ठाण्यात इंग्रजी दैनिकाच्या संपादक, प्रकाशक, मुद्रक आणि दोन वार्ताहरांसह छायाचित्रकाराविरोधात बलात्कारातील मृत तरुणीची माहिती छापल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या गुन्ह्य़ात दंडासह दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
‘बलात्काऱ्यांना दयेच्या अर्जाची मुभा नको’
सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाने देशाला खडबडून जाग आणणाऱ्या तरुणीवर अंत्यसंस्कार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर बलात्कार आणि खून करणाऱ्या गुन्हेगाराला दयेचा अर्ज करण्याची मुभाच असू नये, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. राष्ट्रपतीपदी प्रतिभाताई पाटील असताना त्यांनी मंजूर केलेल्या दयेच्या अर्जात बलात्काऱ्यांनाही माफी मिळाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा