गुजरातच्या विकासाचा खोटा गाजावाजा करणारे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, हे ‘उत्तम विक्रेते’ आहेत, अशी टीका करीत काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत उडी घेतली आह़े मंगळवारी त्यांनी सानंद येथे त्यांनी आपली पहिली प्रचारसभा घेतली़.
जनतेचा आवाज गुजरातमध्ये ऐकला जात नाही़ गुजरात शासन आणि मुख्यमंत्र्यांना तुमचा आवाज ऐकायचा नाही़ त्यांना फक्त स्वत:चाच आवाज ऐकायचा आह़े त्यांना स्वत:चे स्वप्न आहे आणि ते केवळ स्वत:च्या स्वप्नाचाच विचार करतात़ परंतु, खऱ्या नेत्याला जनतेचे स्वप्नच स्वत:चे स्वप्न बनवावे लागते, अशीही खोचक टीका राहुल यांनी या वेळी केली़ .
गुजरात र्सवकष प्रगती करीत असल्याचा खोटा गाजावाजा केला जात आह़े परंतु, वस्तुत: राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे, बेरोजगारी वाढत आहे आणि राज्याची र्सवकष अधोगती होत आहे, असा आरोपही राहुल यांनी या वेळी बोलताना केला़ ‘विक्रेता’ म्हणतो की, गुजरात उजळतो आह़े पण इथे लोकांना तीन दिवसांआड केवळ २५ मिनिटे पाणी मिळत़े सुमारे १० लाख तरुण बेरोजगार आहेत़ तरीही ‘विक्रेता’ म्हणतो गुजरात उजळतो आहे, असेही राहुल म्हणाल़े
पं़ नेहरू आणि गांधीजींना नेहमीच सर्वसामान्य जनतेचा आवाज ऐकायचा होता़ ते खरे नेते होत़े परंतु गुजरातमध्ये नेत्यालाच सर्वसामान्यांचा आवाज ऐकायचा नसल्याने तो दडपला जात आह़े राज्यात विरोधी पक्षांचा आवाजही दपडण्यात येतो़ कारण अधिवेशन वर्षांतून केवळ २५ दिवसच चालविण्यात येत़े त्यातही बहुतांश दिवस विरोधी पक्षांच्या नेत्यांना सभागृहातून बाहेर घालविण्यात येत़े गुजरातमध्ये लोकायुक्त नाही आणि माहिती अधिकाराचे सुमारे १४ हजार अर्ज पडून आहेत़ कारण खरा कारभार उघड करणारी कोणतीही माहिती शासनाला बाहेर येऊ द्यायची नाही, असाही आरोप त्यांनी केला़
पहिल्याच प्रचारसभेत राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र
गुजरातच्या विकासाचा खोटा गाजावाजा करणारे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, हे ‘उत्तम विक्रेते’ आहेत, अशी टीका करीत काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत उडी घेतली आह़े मंगळवारी त्यांनी सानंद येथे त्यांनी आपली पहिली प्रचारसभा घेतली़.

First published on: 12-12-2012 at 03:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criticise in first campagine meeting by rahul gandhi on modi