पीटीआय, नवी दिल्ली

दिल्ली सरकारच्या कथित अबकारी धोरण घोटाळय़ात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करू शकते अशी भीती ‘आप’च्या नेत्या आतिशी यांनी मंगळवारी व्यक्त केली. ईडीने या प्रकरणात केजरीवाल यांना सोमवारी समन्स बजावून २ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

केंद्रातील सत्ताधारी भाजप आपल्या प्रमुख नेत्यांना कारावासात टाकून पक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही अतिशी यांनी केला. केजरीवाल यांना अर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ‘समन्स’ बजावण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी अकराला ‘ईडी’च्या दिल्ली कार्यालयात केजरीवाल हजर झाल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवला जाईल. ‘ईडी’ने केजरीवाल यांना ‘समन्स’ बजावण्याची ही पहिलीच वेळ आहे. सीबीआयने एप्रिलमध्ये त्यांची चौकशी केली होती.दिल्ली सरकारच्या मंत्री अतिशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेला संबोधित करताना दावा केला, की केजरीवाल यांना निवडणुकीत पराभूत करता येऊ शकत नाहीत हे माहीत असल्याने भाजप ‘आप’ला लक्ष्य करण्यासाठी हे डावपेच खेळत आहे. केजरीवाल यांना अटक झाली तर ती त्यांनी सातत्याने भाजपविरोधी भूमिका घेत केलेल्या वक्तव्यांमुळे केलेली कारवाई असेलअसे अतिशी म्हणाल्या.

हेही वाचा >>>व्यावसायिकाच्या १६ वर्षांच्या मुलाची हत्या, महिला शिक्षिकेच्या घरी आढळला मृतदेह

आतिशी  म्हणाल्या, की पंतप्रधान नरेद्र मोदी ‘आप’चे प्रमुख अरिवद केजरीवाल यांना घाबरतात. भाजपला हे चांगले ठाऊक आहे, की ते ‘आप’चा पराभव करू शकत नाही. मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि सत्येंद्र जैन यांच्यासह ‘आप’च्या वरिष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली आहे. ‘आप’ला नष्ट करण्यासाठीच भाजप ही पावले उचलत आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की केजरीवाल यांना ‘करावे तसे भरावे’ या न्यायानुसार या कारवाईला सामोरे जावे लागेल. भाजप ‘आप’ला नष्ट करत आहे, हे आरोप फेटाळताना ते म्हणाले, की हा पक्ष कुकर्म, भ्रष्टाचार व गैरव्यवहारांमुळे स्वत:च स्वत:ला नष्ट करत आहे. या कारवाईशी  भाजपचा संबंध नाही असहीे ते म्हणाले.

‘इंडिया’चे नेते, मुख्यमंत्री लक्ष्य

जरीवाल यांच्या अटकेनंतर भाजप ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’चा वापर करून विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’चे अन्य नेते आणि त्यातील घटक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करेल, असा आरोप आतिशी ????

 यांनी केला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना लक्ष्य केले जाईल असे त्या म्हणाल्या.

केजरीवाल यांना ‘समन्स’ मिळणे अपेक्षितच

केजरीवाल यांना ‘ईडी’ने ‘समन्स’ बजावणे स्वाभाविकच होते. ही कारवाई अपेक्षितच होती. त्यांनी ज्या प्रकारचा भ्रष्टाचार केला आहे आणि ज्या प्रकारे आपलेच निकटचे सहकारी मनीष सिसोदिया यांना त्यात गोवले आहे, हे पाहता केजरीवाल यांना ‘ईडी’ने समन्स बजावणे अपेक्षितच होते, असा दावा भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी केला.

दिल्ली सरकारने केलेला अबकारी धोरणातील एवढा मोठा घोटाळा हा ‘आप’चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांच्या संमतीशिवाय होऊच शकला नसता.- रविशंकर प्रसाद, नेते, भाजप

Story img Loader