कॉँग्रेसच्या रॅलीवर हल्ला चढवून नक्षलवाद्यांनी २७ जणांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच छत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यात शनिवारी अज्ञात हल्लेखोरांशी झालेल्या चकमकीत राष्ट्रीय राखीव पोलीस दलाचा एक अधिकारी ठार झाला़  हा हल्ला नक्षलवाद्यांनी केल्याचा प्राथमिक अंदाज आह़े दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रायपूरपासून सुमारे १५० किमी अंतरावर असलेल्या गरियाबंदच्या जंगलात ही घटना घडली.  ‘२११ विशेष नक्षलीविरोधी बटालियन’चे साहाय्यक समादेशक (कमांडन्ट) एस़ क़े दास  असे अधिकाऱ्याचे नांव आहे.

Story img Loader