छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान आज ( ७ नोव्हेंबर ) पार पडत आहे. २० जागांसाठी ६०० हून अधिक केंद्रावर मतदान पार पडत आहे. यासाठी चोख सुरक्षाही तैनात करण्यात आली आहे. अशातच सुकमा जिल्ह्यात बॉम्बस्फोट झाला आहे. यामध्ये सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे.

श्रीकांत असं जखमी झालेल्या जवानाचं नाव आहे. श्रीकांत यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी किरण चव्हाण ‘इंडिया टुडे’ला यांनी दिली.

Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Nitin Raut Car Accident nagpur Maharashtra Assembly Election 2024
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला अपघात
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
flying squad, seizes more than 2 crore rupees, maharashtra assembly election 2024
वसई-विरार पालिका परिसरात सलग दुसर्‍या दिवशी पैशांचा पाऊस, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त
maharashtra assembly election 2024 amol kolhe allegations bjp for online cash payment to voters
भोसरीत भाजपकडून ‘ऑनलाइन लक्ष्मी दर्शन’?, कोणी केला हा गंभीर आरोप
maharashtra assembly election 2024 bjp strategy for deoli assembly constituency
Deoli Assembly Constituency : देवळीच्या जागेबाबत भाजप अधिक दक्ष

हेही वाचा : “मीच ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपचा मालक, भूपेश बघेल यांच्या सांगण्यावरून…”, फरार आरोपीचा दुबईतून खळबळजनक दावा

किरण चव्हाण म्हणाले, “क्रोब्रा २०६ आणि सीआरपीएफचे जवान टोंडामार्का येथून एलमागुंडा गावाकडे गस्तीसाठी जात होते. तेव्हा नक्षलवाद्यांनी जमिनीत पेरलेल्या आयईडी बॉम्बवर श्रीकांत यांचा पाय पडला. त्यामुळे बॉम्बस्फोट आणि श्रीकांत यांच्या पायाला दुखापत झाली आहे. श्रीकांत यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा :“भाजपा स्वबळावर निवडणूक लढवू शकत नाही, म्हणून…”, भूपेश बघेल यांची टीका

दरम्यान, दोन दिवसांतील आयईडी बॉम्बस्फोटाची ही दुसरी घटना आहे. सोमवारीही कांकेरमध्ये आयईडी बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचे हवालदार आणि मतदान अधिकारी जखमी झाले होते. त्यांच्या पायाला दुखापत झाल्यानं छोटेपेठिया येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.