जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील कूद परिसरातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीवर सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यावेळी झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला असून तीन भारतीय जवान जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जम्मू- श्रीनगर महामार्गावर पोलीसांकडून वाहनांची तपासणी सुरू होती. यावेळी दहशतवाद्यांनी अचानकपणे गोळीबारीला सुरूवात केली. सध्या या परिसरात मोठ्याप्रमाणावर गोळीबार सुरू असून नजीकच्या सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Story img Loader