CRPF soldier opens fire at camp : गुरुवारी मणिपूरमधील एका छावणीत एका सीआरपीएफ जवानाने आपल्या दोन सहकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली. या हल्ल्यात आठजण जखमी झाले आहेत. दरम्यान, यानंतर या जवानाने आत्महत्या केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. आणि आठ जणांना जखमी केले आणि नंतर आत्महत्या केली.
ही घटना रात्री ८ वाजताच्या सुमारास इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील लामफेल येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीत घडली. आरोपी हवालदार संजय कुमारने त्याच्या सर्व्हिस रायफलने गोळीबार केला, यामध्ये एका कॉन्स्टेबल आणि एका सब-इन्स्पेक्टरचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडली आणि नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. कुमार हे सीआरपीएफच्या १२० व्या बटालियनचा भाग होते.
या गोळीबारात आठ कर्मचारी जखमी झाले आणि त्यांना तातडीने उपचारासाठी इम्फाळमधील प्रादेशिक वैद्यकीय विज्ञान संस्था (रिम्स) येथे नेण्यात आले. या घटनेमागील कारणांचा तपास अधिकारी करत आहेत, परंतु सीआरपीएफने अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.