रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध सुरू झाल्यापासून ज्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता होती, त्यातली एक महत्त्वाची समस्या म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता. आता तीच भीती खरी ठरताना दिसत असून अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या ७ वर्षांतला उच्चांक गाठला आहे. अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमती आता १०६ डॉलर प्रतिबॅरल झाल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर होण्याची दाट शक्यता आहे. भारतात आधीच निवडणुकांनंतर रोखून धरलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती अजून वाढण्याची शक्यता असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतींमुळे त्यात अजून भर पडण्याची शक्यता आहे.

एकीकडे अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या किमती १०६.७८ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचल्या असताना आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतली आहे. या किमती १०७.५७ डॉलर प्रतिबॅरल इतक्या वाढल्या आहेत. याआधी थेट जुलै २०१४मध्ये या किमती इतक्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं होतं.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
How to check daily Petrol And Diesel rates
Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
Petrol and Diesel Prices On 7th November
Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं की महाग? तुमच्या शहरातील इंधनाचा दर तपासा

गेल्या आठवड्यात २४ फेब्रुवारी रोजी जेव्हा रशियानं युक्रेनवर पहिला हल्ला केला होता, तेव्हाच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरच्या वर गेल्या होत्या. आधीच कच्च्या तेलाच्या पुरवठ्यामध्ये परिस्थिती क्लिष्ट झालेली असताना आता कच्च्या तेलाच्या पुरवठादारांमध्ये महत्त्वाचा देश असणारा रशियाच युद्धात उतरल्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होणार हे गृहीत धरूनच या किमती वाढल्याचं सांगितलं जात आहे.

Petrol Diesel Price Today: रशिया-युक्रेनमधील संघर्षाचा पेट्रोल डिझेलच्या किमतीवर परिणाम; जाणून घ्या आजचा भाव

“इंधनाच्या बाजारपेठेतली परिस्थिती फारच चिंताजनक झाली आहे. तिथे सातत्याने लक्ष केंद्रीत करावं लागत आहे. इंधनाची जागतिक सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे आधीच करोनाच्या धक्क्यातून सावरत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेसमोर इंधन सुरक्षेचं नवं संकट उभं राहिलं आहे”, अशी प्रतिक्रिया इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचे संचालक फॅतिह बायरल यांनी दिली आहे.