Supreme Court on Section 498(A): विवाह संबंधात पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाल्यानंतर कायद्याचा दुरुपयोग करून नवरा आणि सासरच्या लोकांना त्रास दिला जातो, याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून महिलांनी वैयक्तिक सूड उगवण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करू नये, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तेलंगणामधील एका व्यक्तीविरोधात त्याच्या पत्नीने भादंवि कलम ४९८ (अ) नुसार क्रूरतेची तक्रार दाखल केली होती. सदर गुन्हा रद्द करण्यास तेलंगणा उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायाधीश बीव्ही नागरत्न आणि एन. कोटीस्वार सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या गैरवापराबद्दल नाराजी व्यक्त केली.

भादंवि कायद्यातील कलम ४९८ (अ) किंवा भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्यातील कलम ८६ नुसार विवाहित महिला तिचा पती आणि सासरच्या मंडळीकडून छळ झाल्यास त्याविरोधात दाद मागू शकते. या कायद्यानुसार आरोपीला तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकची शिक्षा होऊ शकते आणि आर्थिक दंडही बसू शकतो. तेलंगणाच्या प्रकरणात लग्न रद्द करण्यासाठी पतीने अर्ज दाखल केल्यानंतर पत्नीने छळवणुकीची तक्रार केली होती.

massive agitation organised against mla bhaskar jadhav in vikas jadhav attack case
हल्ल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आक्रमक, आमदार भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्च्याचे आयोजन
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
There has been demand for law requiring judges to disclose their assets like MPs and mlas
न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करण्याबाबत कायदा? केंद्र शासन म्हणतेय…
Loksatta samorchya bakavarun Supreme Court Article Prohibition of conversion of places of worship
समोरच्या बाकावरून: हे सगळे कुठपर्यंत जाणार आहे?
Case registered against RPF jawan who cheated woman in Dombivli on the promise of marriage
Dombivli fraud case: लग्नाचे आमिष दाखवून डोंबिवलीतील महिलेची फसवणूक करणाऱ्या आरपीएफ जवानाविरुध्द गुन्हा
Supreme Court statement regarding pending cases in court
सर्वोच्च न्यायालयच म्हणाले, प्रकरण निकाली काढण्यासाठी न्यायालयांना वेळेचे बंधन नकोच..
supreme Court
Supreme Court : “आम्ही जामीन दिला नी लगेच तुम्ही मंत्री झालात?”, आर्थिक अफरातफरीच्या आरोपीवर सुप्रीम कोर्ट लक्ष ठेवणार!
Jharkhand man killed live in partner
लिव्ह इन जोडीदाराकडून महिलेची हत्या; शरीराचे ५० तुकडे केले, भटक्या कुत्र्यांमुळे उकलला गुन्हा

हे ही वाचा >> धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप

या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेत असताना खंडपीठाने सांगितले की, महिलेने आपल्या तक्रारीत कुटुंबातील काही केवळ सदस्यांची नावे सबळ पुराव्याशिवाय नमूद केली म्हणून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करता येणार नाही. न्यायालयाने पुढे असेही म्हटले की, कलम ४९८ (अ) आणण्यामागचा हेतू असा होता की, पती आणि सासरच्या मंडळीकडून पत्नीचा होणारा छळ थांबावा. मात्र गेल्या काही वर्षांत संपूर्ण देशभरात कौटुंबिक वादाची प्रकरणे वाढत आहेत. तसेच पत्नीकडून कलम ४९८(अ) चा गैरवापर केला जात असून पती आणि सासरच्या मंडळीवर राग काढण्यासाठी हे कलम दाखल केले जात आहे. यामुळे लग्नसंस्थाच अडचणीत आली आहे.

हे वाचा >> “मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधाची अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप

सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा उच्च न्यायालयालाही फटकारले. पतीविरोधात दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात नकार देऊन उच्च न्यायालयाने गंभीर चूक केली आहे. या प्रकरणात पत्नीने केवळ सूड उगवण्यासाठी पती आणि त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला होता. तसेच काही प्रकरणात पती आणि त्याच्या कुटुंबावर कलम ४९८ (अ) नुसार विनाकारण गुन्हा दाखल झालेला असेल तर तो मागे घेतला गेला पाहीजे, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

अतुल सुभाषच्या आत्महत्येमुळे महिलांच्या छळाचा विषय ऐरणीवर

अतुल सुभाष नावाच्या इंजिनिअरने पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकरण नुकतेच बंगळुरूमधून समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाष यांनी तासाभराचा व्हिडीओ रेकॉर्ड करून आपले म्हणणे मांडले आहे. पत्नी आणि सासरच्या मंडळींनी आपल्याला कसा त्रास दिला, याची माहिती अतुलने व्हिडीओत दिली. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. अतुल सुभाष यांच्या आत्महत्येनंतर आता पत्नींकडून पतीविरोधात कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अतुल सुभाष यांच्या व्हिडीओतील काही भाग सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर जोरदार चर्चा झडत आहेत.

Story img Loader