देशात सध्या यूजीसी नेट परीक्षेवरून चांगलचा गोंधळ सुरू आहे. या परिक्षेचा पेपर फुटल्याचा संशयानंतर केंद्र सरकारने यूजीसी नेट परीक्षा रद्द केल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी केली. त्यानंतर आता आज सीएसआयआर यूजीसी नेट २०२४ ही परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केली आहे. यासंदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एक पत्रक जारी केलं आहे. तसेच सीएसआयआर यूजीसी नेट २०२४ ही परीक्षा पुढे का ढकलण्यात आली? याचेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

यासंदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आज २१ जून रोजी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये सांगितंल की, या निर्णयामागे लॉजिस्टिक समस्येचे कारण असून काही अपरिहार्य कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, ही सीएसआयआर यूजीसी नेट २०२४ ही परीक्षा २५ जून ते २७ जून या कालावधीत होणार होती. मात्र, या परीक्षेला अवघे काही दिवस बाकी असताना आता परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली आहे.

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Canada has ended fast track visas for foreign students
कॅनडात शिक्षणासाठी जाणे कठीण, फास्ट ट्रॅक व्हिसावर घातली बंदी; याचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?
BCCI conducts 6 hour review meeting with Indian team management
BCCI : टीम इंडियाच्या पराभवावर सहा तास चालली बीसीसीआयची बैठक, रोहित-गंभीरला विचारले ‘हे’ तीन महत्त्वाचे प्रश्न
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास

हेही वाचा : ‘बौद्ध धर्मात दोन स्तर, वरीष्ठ स्तरावर ब्राह्मण…’, शालेय पुस्तकातील उल्लेखावर आक्षेप; गुजरात बोर्डाचं चुका सुधारण्याचं आश्वासन!

परीक्षा कधी होणार?

सीएसआयआर यूजीसी नेट २०२४ ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता ही परीक्षा कधी होणार असा सवाल अनेकांनी केला आहे. मात्र, यासंदर्भात परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली आहे. आज जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, सीएसआयआर यूजीसी नेट २०२४ ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तरी पुढील परीक्षेसंदर्भातील माहिती सीएसआयआर यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाइट csirnet.nta.ac.in वर देण्यात येईन. दरम्यान, देशातील सर्वात मोठी परीक्षा एजन्सी परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यात असमर्थ ठरत असल्याची टीका आता होत आहे.

यूजीसी नेट ही परीक्षा का रद्द करण्यात आली?

UGC-NET 2024 मंगळवारी (१८ जून) विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) ही परीक्षा पार पडली. त्याच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे बुधवारी शिक्षण मंत्रालयाने परिपत्रक काढत ही परीक्षा रद्द केली. केंद्रीय गृह मंत्रालयाला या परीक्षेत अनियमितता आढळून आली. मंत्रालयाच्या अखत्यारीत येणार्‍या भारतीय सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटरच्या नॅशनल सायबर क्राईम थ्रेट ॲनालिटिक्स युनिटला परीक्षेविषयी महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली. ज्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. परीक्षा रद्द झाल्यामुळे या वर्षी परीक्षेला बसलेल्या नऊ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. या निर्णयाला विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वी नीट-यूजीचे कथित पेपर लीक प्रकरण समोर आल्यानंतर वाढीव गुण देण्यात आलेल्या १,५६३ विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागेल हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता यूजीसी नेट परीक्षेतही असेच काहीसे घडल्याने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.