कोलकाता उच्च न्यायालयाने एका सामूहिक बलात्कार प्रकरणाची स्वतः दखल घेत रात्री उशिरा पीडितेला फोन करणे आणि भेटणे यावरून पोलिसांना फटकारलं आहे. तसेच असं करणाऱ्या पोलिसांना आर्थिक दंडही ठोठावला आहे. पीडितेला रात्री-अपरात्री कॉल करणं किंवा भेटणं हा त्यांच्या खासगीपणाचा आणि सन्मानाचा भंग असल्याचं मत न्यायालयाने व्यक्त केलं. जस्टिस जॉयमाल्या बागची आणि जस्टिस गौरांग कंठ यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेवर दबाव टाकणाऱ्या आरोपीला जामीन दिल्यावरून पोलिसांना फटकारलं आहे. न्यायालयाने म्हटलं, “लैंगिक शोषणाच्या बळी ठरलेल्या पीडितेला रात्री उशिरा कॉल करणे, भेटणे असे प्रकार या न्यायालयाने कधीही पाहिलेले नाहीत. प्रत्येक व्यक्तिला खासगीपणाचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार सभ्य समाजाचा आधार आहे.”

हेही वाचा : एडिटर्स गिल्डच्या चार सदस्यांना सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षण; पुढील सुनावणीपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

“तपास संस्थांनी पीडितेच्या मुलभूत अधिकारांचं संरक्षण करणं बंधनकारक आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांनीच पीडितेच्या या अधिकारांवर अतिक्रमण केल्याचं दिसत आहे. त्यामुळे पीडितेच्या अधिकारांची उपेक्षा झाली आहे,” असं न्यायालयाने नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Culcutta high court slam police over late night call visit to victim pbs