हैदराबादमध्ये जातीय दंगल उसळल्यानंतर पोलिसांनी लागू केलेली संचारबंदी गुरुवारी, दुसऱ्या दिवशीही कायम होती. किशनबाग परिसरातील  बुधवारी दंगल उसळल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले होते.
सध्या येथील परिस्थिती शांततामय आणि नियंत्रणात असून, अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मात्र तरीही संचारबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सायबराबादचे पोलीस सहआयुक्त वाय. गंगाधर यांनी सांगितले. या परिसरात पोलिसांसह निमलष्कर दलांच्या तुकडय़ा तैनात करण्यात आलेल्या आहेत. येथील एका मैदानात धार्मिक ध्वज जाळल्याने एका समुदायाने पोलीस ठाण्यावर जोरदार दगडफेक केली होती. त्यात १० पोलिसांसह १७ जण जखमी झाले होते. दरम्यान, काही दंगलग्रस्तांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

Story img Loader