येथील बांदीपोर जिल्ह्य़ात सलग तिसऱ्या दिवशी संचारबंदी कायम आहे. पोलिसांच्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. त्यातच र्हुीयत कॉन्फरन्सने बंद पुकारला आणि त्यानंतर बांदीपोरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.  गेल्या दोन दिवसांत पोलिसांवर दगडफेकीच्या तसेच पोलिसांची वाहने पेटवून देण्याच्या काही घटना घडल्या असल्या तरी एकूण परिस्थिती नियंत्रणात असल्याचे लष्करी प्रवक्त्यांनी सांगितले. जिल्ह्य़ातील शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालये अति हिमवृष्टीमुळे आठवडय़ाभरासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, बारामुल्ला येथे सोमवारी दरड कोसळ्याची दुर्घटना घडली,यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरीही अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

Story img Loader