नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी लाल किल्ल्यावरून सलग नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकावणार असून, देशाला संबोधित करणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त यंदाचा सोहळा विशेष महत्त्वाचा आहे. यंदा कोणती महत्त्वाची घोषणा करणार याची उत्सुकता आहे. गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी त्यांनी भाषणात त्यांनी राष्ट्रीय हायड्रोजन मोहीम, गती शक्ती मास्टर प्लान आणि ७५ आठवडय़ांत ७५ ‘वंदे भारत ट्रेन’ सुरू करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी २०२० मध्ये पंतप्रधान मोदींनी सहा लाखांहून अधिक गावे ‘ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ने जोडण्याचे काम एक हजार दिवसांत पूर्ण करण्याची घोषणा केली होती. प्रत्येक नागरिकाला ‘डिजिटल आरोग्य ओळखपत्र’वाटप योजनेचीही त्यांनी घोषणा केली. २०१९ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात त्यांनी ‘तिन्ही संरक्षण दलांचा प्रमुख’ या पदाच्या निर्मितीची घोषणा केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा