सध्याची भारताची खालावणारी आर्थिक स्थिती ही १९९१ साली भारताने सोसलेल्या मंदीपेक्षा भयानक आहे; परंतु संयुक्त पुरोगामी आघाडीचे शासन ही स्थिती हाताळण्यात पूर्णत: अयशस्वी ठरले आहे, अशी टीका तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी केली आह़े
योग्य शासन नाही़ शासनाला धोरण-लकवा झाला आह़े त्यातच भ्रष्टाचाराची भर पडली आह़े काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआने गेल्या नऊ वर्षांत देश पूर्णत: उद्ध्वस्त केला आह़े केंद्र शासन स्वत:च माफियांसारखे वागत आहे, अशी खरमरीत टीकाही नायडू यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली़
मी इतकी वाईट आर्थिक स्थिती माझ्या राजकीय कार्यकाळात अद्याप पाहिलेली नाही़ रुपयाने नीचांक गाठला आह़े परकीय गुंतवणूकदार भारतापासून दूर जात आहेत़ तरीही शासन जबाबदारी स्वीकारायला तयार नाही आणि पंतप्रधान नेहमीप्रमाणेच मूग गिळून आहेत, असेही ते म्हणाल़े
आघाडी शासन आर्थिक स्थितीचा अभ्यास करून सुधारणात्मक उपाय योजीत नसल्याबद्दलही त्यांनी शासनावर कडाडून टीका केली़ संपुआ सपशेल अपयशी ठरले आहे आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाही त्यांच्या मर्यादा आहेत़ त्यामुळे आम्ही काय करायचे ते योग्य वेळी ठरवू, असे सूतोवाचही चंद्राबाबू यांनी केल़े तिसऱ्या आघाडीच्या पर्यायाबाबत मात्र त्यांनी अनुत्सुकता दाखविली़
सध्याची आर्थिक स्थिती ९१ पेक्षा भयानक – चंद्राबाबू
सध्याची भारताची खालावणारी आर्थिक स्थिती ही १९९१ साली भारताने सोसलेल्या मंदीपेक्षा भयानक आहे; परंतु संयुक्त पुरोगामी आघाडीचे शासन ही स्थिती हाताळण्यात पूर्णत: अयशस्वी ठरले आहे,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-08-2013 at 04:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Current economic situation worse than 1991 chandrababu