Cyclone Chido in France : सर्वांत शक्तीशाली चक्रीवादळ चिटो हे चक्रीदावळ फ्रेंच हिंदी महासागराच्या मेयोट येथे धडकले असून आतापर्यंत या चक्रीवादळात हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त रॉयटर्सने दिले आहे. एका वरिष्ठ स्थानिक फ्रेंच अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.
“मला वाटतं येथे नक्कीच शेकडो किंवा कदाचित हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे”, असं प्रिफेक्ट फ्रँकोइस झेविअर बिउविले यांनी स्थानिक माध्यमाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय.
चिडो चक्रीवादळातील मृतांच्या संख्येबद्दल विचारले असता, फ्रेंच गृह मंत्रालयाने म्हटलंय की, सर्व बळींचा हिशेब घेणे कठीण आहे. या टप्प्यावर एकूण आकडा सांगणे शक्य नाही.
गेल्या शतकभरातील सर्वांत भीषण चक्रीवादळ
चिडो चक्रीवादळ रात्री मेयोटला धडकले. २०० किमी प्रतितासपेक्षा जास्त वेगाने वाऱ्यासह घरांचे, सरकारी इमारतींचे आणि रुग्णालयांचे नुकसान झाले आहे. बेटांवर आदळणारे हे ९० वर्षांहून अधिक काळातील सर्वांत शक्तीशाली वादळ होते, असंही म्हटलं जातंय.
मामूदझौचे महापौर अंबदिलवाहेदौ सौमैला यांच्या म्हणण्यांनुसार, चक्रीवादळामुळे रुग्णालये आणि शाळांचे प्रचंड नुकसान झाले. नऊ जणांची प्रकृती गंभीर आहे. इतर २४६ जण गंभीर जखमी आहेत. ही परिस्थिती विनाशकारी आहे.”
चक्रीवादळामुळे बेटाच्या लोकसंख्येचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या झोपडपट्टीचाही नाश झाला. यामुळे अनेक रहिवाशांचाही समावेश आहे. त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत. माजी परिचारिका ओसेनी बलाहाची यांच्या म्हणण्यांनुसार, हद्दपार करतील या भीतीने अनेकांनी सरकारी मदत नाकारली.”
“प्रामाणिकपणे, आम्ही जे काही अनुभवत आहोत तो एक शोकांतिका आहे. एक अख्ख क्षेत्र गायब झालंय”, असं रहिवासी मोहम्मद इश्माएल यांनी सांगितलं.
अतिवृष्टी आणि पूराचा इशारा
चिडो चक्रीवादळ कोमोरोस बेटांवरही धडकले आहे. त्यामुळे किरकोळ नुकसान झालं आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ मोझांबिकमध्ये धडकले, तिथे तीन जणांचा मृत्यू झाला. तसंच, मलावी, झिम्बाब्वे आणि झांबियामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तिथे पूराची शक्यताही वर्तवली आहे.