Viral Video of Plane Landing Attempt during strong wind : चक्रीवादळ फेंगलमुळे तामिळनाडू आणि पद्दुचेरीमध्ये शनिवारी हवामान बिघडल्याचे पाहायला मिळाले. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे येथील सामान्य जनजीवन विस्कळित झाले होते. मुसळधार पावसामुळे चेन्नई शहरातील सखल भागांमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. या खराब वातावरणाचा फटका विमान सेवेला देखील बसला. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नई विमानतळ रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान या बिघडलेल्या हवामानादरम्यान चेन्नई विमानतळावरील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये एक विमान जमिनीवर उतरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
प्रतिकूल हवामानात विमान खाली उतरवणे किती जोखमीचे असू शकते हेच या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. जमिनीवर जवळपास टेकलेल्या विमानाला अगदी शेवटच्या क्षणी त्याचे लँडिंग रद्द करावे लागले. जमिनीपासून अगदी काही इंचावर असलेल्या या विमानाचा अपघात होणार असे वाटत असतानाच हे विमान पुन्हा आकाशात झेपावले. दरम्यान हेलकावे खात लँडिंगचा प्रयत्न करत असलेल्या या विमानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरलहोत आहे. या व्हिडीओवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत . काही वापरकर्त्यांनी विमानातील प्रवासी अगदी थोडक्यात बचावले अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहीजण खराब हवामान असताना विमानाचे लँडिंग न करता ते परत घेऊन जाणे ही सामान्य बाब असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा >> तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं आहे का? एकनाथ शिंदेंचं दरेगावातून मोठं भाष्य
l
तमिळनाडू, पद्दुचेरीत जोरदार पाऊस
पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्यापूर्वी फेंगल चक्रीवादळ कुड्डालोरच्या उत्तरेस अंदाजे ३० किलोमीटर आणि विल्लुपुरमच्या पूर्वेला ४० किलोमीटर अंतरावर सहा तासांसाठी स्थिर झाले होते. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पहाटे ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत चक्रीवादळाने आपली जागा बदलली नाही, ते चेन्नईच्या दक्षिण-नैऋत्य १२० किलोमीटर अंतरावर स्थिर राहिले. त्यानंतर पुढील सहा तासांत हे चक्रीवादळ तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या उत्तरेकडील किनारपट्टीवरून हळूहळू पश्चिमेकडे वाहून जाईल आणि कमकुवत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. चक्रीवादळ रेंगाळल्याने परिसरात जोरदार पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने या वादळाच्या पार्श्वभूमीवर उत्तर तामिळनाडू, पद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या काही भागांसाठी रेड अलर्ट जारी केला होता.
हेही वाचा >> महाराष्ट्राच्या निवडणूक निकालानंतर केजरीवालांचा काँग्रेसला धक्का, दिल्लीच्या विधानसभा…
u