चेन्नई : ‘मिचौंग’ चक्रीवादळाचा चेन्नई आणि आसपासच्या जिल्ह्यांना मोठा फटका बसला. या वादळानंतर दोन दिवसांनीही बुधवारी स्थानिक रहिवाशांना तुंबलेल्या पाण्याचा तसेच खंडित वीजपुरवठय़ास तोंड द्यावे लागत आहे. स्थानिक यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी मदत आणि पुनर्वसनाचे प्रयत्न गतिमान केले आहेत. चेन्नईतील शाळा आणि महाविद्यालयांना ७ डिसेंबरला आणखी एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
चक्रीवादळात झालेल्या अतिवृष्टीने वेलच्चेरी, तांबरमसह अनेक भागात पाणी साचले होते. बुधवारीही जलमय झालेल्या भागातील पूरग्रस्त रहिवासी आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी जात होते. अनेक पूरबाधितांनी स्थलांतरासाठी अधिक नौका पाठवण्याची आणि अन्य मदतीची विनंती केली.
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला. शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडून साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी आढावा घेतला. त्यांनी केंद्राला पत्र लिहून परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाच हजार ६० कोटी रुपयांची प्राथमिक मदत देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा >>> भारत चंद्रावर अंतराळवीर पाठवणार? पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, मोहिमेचं वर्षही जाहीर केलं
हवाई वाहतूक सुरळीत, रेल्वेसेवा विस्कळीत
शहर पोलिसांनी बुधवारी सांगितले की सहा नागरिकांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे, तर पोलिसांनी शहरातील विविध भागांतून अनेक नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. विमानतळावर हवाई वाहतुकीत कोणताही व्यत्यय आला नाही, तर दक्षिण रेल्वेने अनेक रेल्वेगाडय़ा रद्द केल्याची आणि अनेक गाडय़ांचे मार्ग बदलल्याचे जाहीर केले.
स्थिती पूर्ववत होईपर्यंत अधिकारी वादळग्रस्त भागात तैनात- मोदी
‘‘मिचौंग वादळाचा फटका बसलेल्या भागात वादळ आणि पूरबाधित नागरिकांना मदत करण्याचा प्रशासनाचे अथक प्रयत्न सुरू आहेत. अधिकारी आणि कर्मचारी तेथे तैनात असून येथील परिस्थिती पूर्ववत आणि सामान्य होईपर्यंत त्यांचे मदतकार्य सुरू राहील,’’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिली. चक्रीवादळामुळे बाधित नागरिकांबाबत सहसंवेदना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘एक्स’वर नमूद केले, की मिचौंग चक्रीवादळामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या कुटुंबांच्या दु:खात मी सहभागी आहे.
३७२ मदतकेंद्रात ४१ हजारांहून अधिक नागरिकांचा आश्रय
तामिळनाडूच्या विविध जिल्ह्यांतील ३७२ मदत केंद्रांमध्ये ४१ हजार ४०० नागरिकांनी आश्रय घेतला असून, त्यांना अन्नपुरठा केला जात आहे. चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपेट या चार सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांतील ८०० हून अधिक ठिकाणे जलमय झाली आहेत. या भागांत २०० हून अधिक नौका तैनात आहेत. १९ हजार बाधितांना मदत शिबिरांत हलवण्यात आले.
आंध्रमधील १९४ गावांसह ४० लाख नागरिकांना फटका
अधिकृत आकडेवारीनुसार, चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशातील १९४ गावे आणि दोन शहरांमधील सुमारे ४० लाख नागरिकांना फटका बसला आहे. २५ गावांना पुराचा फटका बसला आहे. चेन्नई, तामिळनाडू आणि आसपासच्या भागात चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे घडलेल्या विविध दुर्घटनांत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.