पायलिन नावाचे महाचक्रीवादळ पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात आले असून, ते पुढे ओडिशापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर पोहोचले आहे.  तसेच हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जवळपास १८ मच्छिमार समुद्रात फसले गेले असल्याचीही माहिती समोर आली आहे.
वादळाचा तडाखा ओडिशा व आंध्र प्रदेश या दोन राज्यांना प्रामुख्याने बसणार आहे. ताशी २०५ कि.मी. वेगाने हे वादळ येण्याची दाट शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत आतापर्यंत पाच लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
वादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र, ओडिशामध्ये घटलेल्या घटना-
*सायंकाळी ९:२० : पायलिनची तिव्रतावाढण्यास अवघ्या एकतासाचा अवधी 
*सायंकाळी ९:१५ :पायलिनचा ओडिशा किनारपट्टीवरील धूमाकूळ ६ तास चालणार, २४ तास पाऊस राहणार
*सायंकाळी ९:१० : ओडिशा किनारपट्टीवर मुसळधार पाऊस
*सायंकाळी८:४० : कोणत्याही क्षणी पायलिन ओडिशा किनारपट्टीला धडकणार , आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम भागात अतिवृष्टी
*सायंकाळी८:३७ : मुसळधार वादळी पावसाने ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील गोपालपूर येथील ५ जणांचा मृत्यू
*सायंकाळी७:४५ : ओडिशा किनाऱ्यापासून पायलिन वादळ ३० किमी अंतरावर.
*सायंकाळी ७:३१: जनतेच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शासकीय यंत्रणांना दोनही राज्यांच्या सरकारांना आवश्यकते सहकार्य करण्याचे निर्देश दिले 
* सायंकाळी ६:२९ मि.- वादळ गोपालपूरपासून ४० किमी. अंतरावर
*  सायंकाळी ६:२५ एअर इंडिया, इंडिगो आणि जेट एअरवेजची सर्वच उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे बिजू पटनायीक विमानतळाचे संचालक सरद कुमार यांनी सांगितले.
* सायंकाळी ६:०१ मि.- पायलिन ओडिशापासून ५० किमी. अंतरावर
* दुपारी ४:४५ मि.- आंध्र, ओडिशात मुसळधार पावसाला सुरूवात
* दुपारी ३:०० वाजता- सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या रद्द
* दुपारी २.२० मि.- राष्ट्रपतींचा पश्चिम बंगाल दौरा वादळाच्या पार्श्वभूमीवर रद्द
* दुपारी १:४५ मि.- ओडिशापासून १५० अंतरावर वादळ पोहोचले

हवामान खात्याच्या निवेदनात म्हटले आहे, की पायलिन चक्रीवादळ सध्या पश्चिमेकडून नैर्ऋत्येकडे सरकत असून त्याचा वेग ताशी पंधरा किलोमीटर आहे. सध्या दक्षिण-आग्नेयेकडे ते गोपाळपूरपासून ५३० किलोमीटर अंतरावर असलेल्या पारादीप येथे आहे म्हणजेच ते कलिंगपट्टणमपासून पूर्व-आग्नेयेला ५३० कि.मी. अंतरावर आहे असे हवामान खात्याने सांगितले. हे चक्रीवादळ वायव्येला जात असून ते आंध्रचा उत्तर किनारा पारादीप व कलिंगपट्टणमच्या दरम्यान ओलांडून ओडिशाकडे येईल
पायलिनचे सावट-
नौदल सज्ज
संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी सांगितले, की रायपूर, नागपूर, जगदाळपूर, बराकपूर, येथे आयएएफ आयएल ७६ ही विमाने मदतकार्यासाठी सज्ज आहे. याशिवाय सी १ प्रकारची ३० विमाने, १८ हेलिकॉप्टर, एन ३२ प्रकारची दोन विमाने सज्ज ठेवण्यात आली आहेत.