बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे निर्माण झालेले चक्रीवादळ सोमवारी दुपारी १२ ते अडीच वाजण्याच्या सुमारास तामिळनाडू आणि पुड्डुचेरीच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता होती. त्यामुळे या भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
चेन्नई, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर या जिल्ह्य़ांमध्ये यापूर्वीच पावसाला सुरुवात झाली असून पुराच्या पाण्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या भागातील शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आली असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.
सोमवारी सकाळी वादळ किनाऱ्यापासून आग्नेयेला ३०० किलोमीटर अंतरावर होते. वाऱ्यांचा वेग तासाला साधारण ७५ किलोमीटर इतका होता आणि वादळ दुपारी कुडालोर येथे किनाऱ्यावर दाखल होण्याची
शक्यता होती. हवामान खात्याने आसपासच्या परिसरात धोक्याचा इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा