Biporjoy Cyclone Tracking : गोव्यापासून ७०० आणि मुंबईपासून ६३० किमीवर असलेले बिपरजॉय चक्रीवादळ येत्या सहा तासांत तीव्र रुप धारण करणार आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व- मध्य अरबी समुद्रावर चक्रीवादळ ५ किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकणार आहे. ANI या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. शनिवारी (१० जून) बिपरजॉय चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीपासून ६०० किलोमीटर अंतरावर होते. परंतु, या काळात मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात वारे वेगाने वाहत होते. धुळीचंही साम्राज्य निर्माण झालं होतं. परंतु, असं असलं तरीही शहरांत दिवसभर उकाडा कायम होता. परंतु, मुंबईत रात्री पावसाच्या सरी कोसळल्या.

दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळ पुढच्या सहा तासांत तीव्र रुप धारण करणार आहे. तीव्र रुपातच ते उत्तरेकडे सरकेल. १५ जूनपर्यंत हे वादळ अत्यंत तीव्र होत पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी धडकू शकेल, असा अंदाजही भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ शनिवारी रात्री ११.३० वाजता अक्षांश १७.४ आणि लांब ६७.३ ई जवळ मुंबईपासून ६०० किमी आणि पोरबंदरपासून ५३० किमी आणि कराचीपासून ८३० किमी अंतरावर होते. हे वादळ १५ जूनपर्यंत तीव्र होऊन पाकिस्तान, सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीववर पोहोचेल, असंही हवामान खात्याने सांगितले.

parks in navi mumbai city in worse condition
उद्याने बकाल; सुरक्षा धोक्यात; महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे नवी मुंबई शहरातील उद्यानांची दुरवस्था
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
road along Seawoods creek flamingo habitat was recommended for closure
फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस
Cyclone Feingal cleared entire state and once again state is heading towards winter
विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस
temperature declined in central Maharashtra
उत्तर महाराष्ट्र गारठला, मध्य महाराष्ट्रातील पारा खाली
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Mumbai, Metro Worli, Mumbai, Metro Mumbai,
मुंबई : मार्चपासून मेट्रोची धाव वरळीपर्यंतच

हेही वाचा >> बिपरजॉय चक्रीवादळ २४ तासांत तीव्र, मुंबईत जोरदार वारे, समुद्रही खवळलेला

कराची पोर्ट ट्रस्टवर हाय अलर्ट जारी

येत्या ६ तासांत हे वादळ अत्यंत तीव्र चक्रीदावळात रुपांतरीत होण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळामुळे कराची पोर्ट ट्रस्ट येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कराची पोर्टपासून चक्रीवादळ ९०० किमी अंतरावर असण्याचा अंदाज असल्याचे वृत्त पाकिस्तानातील एआरवाय न्यूजने दिले होते.

कराची पोर्ट ट्रस्टने (KPT) बिपरजॉय चक्रीवादळामुळे जहाजे आणि बंदर सुविधांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. तसंच, जहाजांशी संपर्क साधण्यासाठी दोन आपत्कालीन फ्रिक्वेन्सी जारी केल्या आहेत. वादळाचा प्रभाव पाहता रात्रीच्या वेळी जहाजांची वाहतूक थांबवण्यात येईल, असंही KPTने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. KPTने कराची आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलवर जहाजांच्या दुहेरी बुकींगवर बंदी घातली आहे. यापूर्वी शनिवारी कराची प्रशासनाने बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कराची प्रशासनाने कलम १४४ अंतर्गत समुद्रात मासेमारी, नौकनयन, पोहण्यावर बंदी घातली होती.

मुंबईत जोरदार वारे

बिपरजॉय चक्रीवादळाची चाहूल देणारे जोरदार वारे मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरात शनिवारी वाहत होते. जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी धुळीचे लोट उसळले. तसेच मुंबई शहर आणि उपनगरात १६ वृक्ष उन्मळून पडले. 

मोसमी पाऊस ४८ तासांत महाराष्ट्रात

अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताच मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकची किनारपट्टी गाठली. सोमवापर्यंत गोवा आणि महाराष्ट्रात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

मुंबईला धोका नाही?

चक्रीवादळाची तीव्रता वाढू शकते. मात्र त्याचा मुंबईला धोका नाही. मुंबई आणि आसपासच्या परिसरात दोन दिवस जोरदार वारे वाहतील. काही ठिकाणी हलका पाऊसही पडू शकतो, अशी माहिती हवामान विभागाच्या सुषमा नायर यांनी दिली.

Story img Loader