D. Y. Chandrachud : दीर्घकाळ सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेला लोक इतके कंटाळले आहेत की ते न्यायालयाबाहेर तोडगा काढतात. न्यायालयीन प्रक्रिया म्हणजे त्यांना शिक्षा वाटत असल्याची चिंता भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (D. Y. Chandrachud) यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी पर्यायी विवाद निवारण यंत्रणा म्हणून लोकअदालतची भूमिका अधोरेखित केली. सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालत सप्ताहाच्या कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते.

न्यायाधीश म्हणून ही चिंतेची बाब

“ही एक समस्या आहे जी न्यायाधीश म्हणून आपण पाहतो. लोक इतके त्रस्त होतात की ते संबंधित प्रकरणात कोणतीही सेटलमेंट करायला तयार होतात. त्यांना फक्त कोर्टापासून मुक्ती हवी असते. न्यायालयीन प्रक्रिया ही शिक्षा आहे आणि न्यायाधीश म्हणून ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे”, असं डी. वाय. चंद्रचूड (D. Y. Chandrachud) म्हणाले.

Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
DY Chandrachud on euthanasia case
Ex CJI DY Chandrachud: शेवटच्या दिवशी न्या. चंद्रचूड यांचा महत्त्वाचा निकाल; मुलाच्या इच्छामरणाची मागणी करणाऱ्या पालकांना दिला दिलासा
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Justice Chandrachud retires
अग्रलेख : सरन्यायाधीशांस, सप्रेम…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी “मेगा सेटलमेंट ड्राइव्ह” म्हणून आठवडाभर चालणारी पहिली लोकअदालत सुरू केली. “आम्ही सात न्यायाधीशांनी ही सुरुवात केली असून या लोकअदालतमधून पुरेसे काम होईल की नाही, याची आम्हाला काळजी होती. पण गुरुवारपर्यंत एवढं काम होतं की ही लोकअदालत चालवण्यासाठी आम्हाला १३ न्यायाधीशांची गरज लागली”, असं सरन्यायाधीश (D. Y. Chandrachud) म्हणाले.

हेही वाचा >> Supreme Court : समलिंगी, ट्रान्सजेंडर व सेक्स वर्कर्स रक्तदान करू शकणार? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश

आम्ही पितृसत्ता, दडपशाहीविरोधात कार्य केलं

“अनेक लोक मला विचारतात की सर्वोच्च न्यायालयाला अशा लहान प्रकरणांचा सामना का करावा लागतो? उद्देश काय? हा सर्वोच्च न्यायालयाचा हेतू आहे का? आणि मी नेहमी असे म्हणत प्रतिक्रिया देतो की जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना तयार केली तेव्हा त्यांनी ते एका ध्येयाने केले. जिथे न्याय मिळण्याची शक्यता नव्हती अशा गरीब समाजात त्यांनी न्यायालयाची स्थापना केली. आम्ही पितृसत्ता, दडपशाही, जात, भेदभाव या वसाहती संरचनांमध्ये कार्य केले”, असं ते (D. Y. Chandrachud) म्हणाले.

लोकांच्या घरापर्यंत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न

“आमच्या अदालतचा उद्देश खऱ्या अर्थाने लोकांच्या घरापर्यंत न्याय मिळवून देणे, लोकांना त्यांच्या जीवनात आम्ही सतत उपस्थित आहोत याची आठवण करून देणे हा आहे. या लोकअदालतीचे कामही राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) करते. २०२३ मध्ये NALSA ने तब्बल ८.१ कोटी केसेस सोडवल्या”, असंही सरन्यायाधीश (D. Y. Chandrachud) म्हणाले.

“न्यायालय म्हणून आपण जे काही करतो ते संस्थात्मक असले पाहिजे यासाठी हा माझा एक उपक्रम आहे. परंतु हा उपक्रम तात्पुरता नसवा. जो पुढच्या १५ वर्षांत विसरला जाईल. ही प्रक्रिया न्यायव्यवस्थेच्या प्रणालीचा एक भाग होईल, याची आम्ही खात्री देतो, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.