Government Employees DA Salary : केंद्र सरकारने दिवाळीआधी शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (डीए) वाढवण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. याचवेळी शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदा लाखो शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी देशातील काही महत्वाच्या प्रश्नासंदर्भात चर्चा झाली. यावेळी काही महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले. या बैठकीत केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या (Government Employees) महागाई भत्त्याबाबतही चर्चा झाली. या चर्चेनंतर अखेर शासकीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
दरम्यान, आज केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) करण्यात आलेली वाढ ही १ जुलै २०२४ पासूनच लागू असणार आहे. म्हणजे थकबाकीसह हा महागाई भत्ता (DA Hike Salary) कर्माचाऱ्यांना देण्यात येणार आहे. तसेच याचा लाभ पेन्शन (Pension) धारकांनाही मिळणार आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
महागाई भत्त्यात किती टक्यांनी वाढ?
केंद्र सरकारने (Central Govt) आज घेतलेल्या निर्णयानुसार, केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ३ टक्क्यांच्या वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता दिवाळी आधी महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के होईल. एवढंच नाही तर याची अंमलबजावणी जुलैपासून होणार आहे. म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांची थकबाकी देखील या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
डीएमध्ये किती वेळा वाढ होते?
शासकीय कर्मचाऱ्यांना डीए (DA) दिला जातो आणि पेन्शनधारकांना डीआर (महागाई सवलत) दिले जाते. यामध्ये वर्षांतून दोनवेळा वाढ करण्यात येत असते. जानेवारी आणि जुलैमध्ये ही वाढ केली जाते. त्याचा लाभ शासकीय कर्मचाऱ्यांना होत असतो. त्यामुळे सरकारने जानेवारीमध्ये डीएमध्ये वाढ केली होती. मात्र, त्यानंतर जुलैमध्ये देण्यात येणारा महागाई भत्ता (DA Hike) बाकी होता. मात्र, सरकारने घेतलेल्या आजच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण थकीत महागाई भत्ताही देण्यात येणार आहे. तसेच पेन्शनधारकांना डीआर देखील देण्यात येणार आहे.