डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्याची मागणी कॉंग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी गुरुवारी केली. दाभोलकर यांच्या हत्येला १५ दिवस उलटल्यानंतरही अजून पोलिसांना आरोपींचा छडा लागलेला नाही. त्यामुळे हा तपास एनआयएकडेच दिला पाहिजे, असे त्यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी श्रीरामपूर रडारवर
दाभोलकर यांची २० ऑगस्ट रोजी पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर अज्ञात व्यक्तीने गोळ्या घालून हत्या केली होती. याचा तपास करण्याचे काम पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आहे. तपासासाठी पोलिसांनी १९ तुकड्या तयार केल्या आहेत. मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे पोलिस या गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी पुणे पोलिसांना मदत करीत आहेत. तरीही अद्याप या हत्येचा उलगडा झालेला नाही.
राज्यात अंनिसने घेतलेल्या अठरा कार्यक्रमांवर पोलिसांचे लक्ष केंद्रित
ठराविक समाजाकडूनच गुन्हेगारी कृत्ये केली जातात, असा महाराष्ट्रातील पोलिसांचा समज झाला आहे. त्यामुळे ते दाभोलकरांच्या हत्येचा तपास करण्यात सक्षम नाहीत, असा आरोप दलवाई यांनी केला. पोलिसांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. उगाचच लोकांना प्रवचन देत फिरू नये, असाही सल्ला दलवाई यांनी दिला.
सात ठिकाणच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात हल्लेखोर दिसले
दाभोलकर हत्येचा तपास एनआयएकडे द्या – हुसेन दलवाई
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्याची मागणी कॉंग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी गुरुवारी केली.
First published on: 05-09-2013 at 02:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dabholkar murder case should be give to nia says husain dalwai