Patanjali vs Dabar Legel Battle : उद्योग क्षेत्रात जाहिरातींची लढाई नवीन नाही. अनेक कंपन्या जाहिराती, ट्रेडमार्क आणि कॉपीराईट यासारख्या मुद्द्यांवर सतत एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळते. आता डाबर इंडिया आणि पतंजली आयुर्वेद च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून कायदेशीर लढाईसाठी दिल्ली न्यायालयात पोहचले आहेत. डाबरने दावा केला आहे की, पतंजलीच्या जाहिरातीतून दिशाभूल करणारी माहिती परवण्यात येत आहे. असे करताना पतंजलीने सर्व सीमा ओलांडल्या आहेत. दरम्यान, पतंजली त्यांच्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यांमुळे आणि जाहिरातींमुळे यापूर्वीही अनेकवेळा चर्चेत आली आहे.

पतंजलीचीच्या एक जाहिरातीमुळे हे प्रकरण आता न्यायालयात पोहचले आहे. डाबरच्या म्हणण्यानुसार, पतंजलीने त्यांच्या एका जाहिरामुळे डाबर च्यवनप्राशच्या ग्राहकांची दिशाभूल होत आहे. पतंजलीने एका जाहिरातीत, त्यांच्या च्यवनप्राशमध्ये ५१ औषधी वनस्पती असल्याचे म्हटले आहे. पण हे दाखवताना त्यांची जाहिरात डाबरच्या च्यवनप्राशमध्ये केवळ फक्त ४० औषधी वनस्पती असल्याचे सूचित केले जात आहे.

Monalisa Marathi News
Monalisa : मोनालिसाचा आरोप, “काही लोक फोटो काढण्यासाठी सक्तीने तंबूत आले आणि माझ्या भावाला…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Andhra College Student Jumps Off 3rd Floor
Viral Video : शिक्षकासमोरच वर्गातून उठून बाहेर गेला अन् गॅलरीतून मारली उडी; विद्यार्थ्याची ऑन कॅमेरा आत्महत्या
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
Sarang Punekar was a strong supporter of the Ambedkarite movement
Sarang Punekar : सावित्रीबाई फुले विद्यापीठातील उच्चशिक्षित तृतीयपंथीय विद्यार्थी सारंग पुणेकरची आत्महत्या, जयपूरमध्ये संपवलं आयुष्य
auto driver who helped saif ali khan says not able to work
सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “मी घाबरलोय कारण…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला असता तर…
Birthright Citizenship, US, Donald Trump,
विश्लेषण : ट्रम्प यांचा ‘बर्थराइट सिटिझनशिप’ संपवणारा आदेश काय आहे? यामुळे भारतीयांमध्ये खळबळ का?

याचबरोबर पतंजलीच्या जाहिरातीत कथितपणे डाबरच्या च्यवनप्राशमध्ये मर्क्युरी असल्याचे म्हटले आहे. यावर आक्षेप घेत डाबरचा असा युक्तिवाद आहे की, यामुळे केवळ त्यांची प्रतिष्ठाच खराब होत नाही तर ग्राहकांचा आमच्यावर अनेक दशकांपासून असलेल्या विश्वासालाही तडा जात आहे.

दुसरीकडे, या प्रकरणावर पतंजलीने आपले म्हणणे मांडत त्यांच्या जाहिरातीत काहीही चुकीचे नसल्याचे सांगत, हा शोऑफ असल्याचे म्हटले आहे. जाहिरात धोरणाद्वारे प्रत्येक ब्रँड त्यांच्या स्पर्धकांना लक्ष्य न करता त्यांच्या उत्पादनांबद्दल माहिती देत असतात. पतंजलीचे पुढे म्हटले आहे की, त्यांनी जाहिरातीत डाबरचे नाव घेतले नाही किंवा उत्पादनांची थेट तुलना केलेली नाही.

जाहिरातीत काय आहे?

ज्या जाहिरातीवरून न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे त्यामध्ये, बाबा रामदेव, “ज्यांना आयुर्वेद आणि वैदिक परंपरांचे ज्ञान नाही ते अस्सल च्यवनप्राश तयार करू शकत नाहीत”, असे म्हणत असल्याचे ऐकू येते. यावर डाबरचे म्हणणे आहे की, “हे विधान असे सूचित करते की, फक्त पतंजलीचे उत्पादनच अस्सल आहे, तर इतर ब्रँड निकृष्ट किंवा बनावट आहेत.”

यापूर्वी डाबर विरोधात कॅपिटल फूड्स न्यायालयात

गेल्या आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयाने एफमजीसी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या डाबरला नोंदणीकृत ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून नोटीस बजावली होती. टाटा ग्रुपच्या मालकिच्या कॅपिटल फूड्सने त्यांची नोंदणीकृत ट्रेडमार्क ‘शेझवान चटणी’ डाबरने ‘चिंग्ज शेझवान चटणी’ म्हणून बाजारात आणली असल्याचा आरोप केला होता.

Story img Loader