गाय ही फक्त एक पशू असून ती कोणाची आई होऊ शकत नाही, असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. मार्कंडेय काटजू यांनी केलयं. तसेच, नोएडाच्या दादरीमध्ये गोमांसच्या अफवेवरून एका मुस्लिम व्यक्तिच्या झालेल्या हत्येमागे राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
काल काशी हिंदू विश्वविद्यालयातील एका कार्यक्रमात काटजू बोलत होते. ते म्हणाले की, ‘गाय फक्त एक प्राणी आहे आणि कोणताही प्राणी माता असू शकत नाही. जर मला गोमांस खाण्यास आवडत असेल तर त्यात चूकीचं काय आहे? जगभरात लोकं गोमांस खातात. जर मला ते खाण्यास आवडत तर मला कुणी थांबवू शकत नाही’.
काटजू यांच्या या वक्तवानंतर काशी हिंदू विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरोधात निदर्शने केली. तसेच काटजू यांचा रस्ता अडविण्याचीही प्रयत्न केला.

Story img Loader