देशभरात गाजलेल्या दादरी हत्याकांडासंदर्भात मंगळवारी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून (फॉरेन्सिक लॅब) सादर करण्यात आलेल्या अहवालात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. मोहम्मद अखलाख याच्या घरात सापडलेले मांस हे गाय किंवा त्याच प्रजातीच्या पशुचे होते, असा अहवाल मथुरास्थित फॉरेन्सिक लॅबकडून तयार करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी प्राथमिक तपासणीत हे बकऱ्याचे मांस असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता नव्या अहवालात ते गोमांसच असल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘…तर हैदराबादचे दादरी करून टाकेन’ 
उत्तर प्रदेशातील दादरी येथे घडलेल्या घटनेत बिसरा खेडय़ात मोहम्मद अखलाख नावाच्या मुस्लीम व्यक्तीस गाईचे मांस सेवन केल्याच्या संशयावरून जमावाने ठार मारले होते. अखलाखच्या घरात गाईचे मांस सेवन केले जात आहे, असे मंदिरातील ध्वनिक्षेपकावरून जाहीर करण्यात आले. त्यामुळे २८ सप्टेंबरच्या रात्री दोनशे जणांचा जमाव त्याच्या घरावर चाल करून गेला व त्याला ठार केले. त्याचा मुलगा दानिश यात जखमी झाला. पोलिसांनी या प्रकरणी भाजपच्या स्थानिक नेत्याच्या मुलासह दहा जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली होती.
गोवंशप्रतिपालकांचा विजय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा