करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतात दैनंदिन करोना रुग्णांची संख्या घटली आहे. गेल्या २४ तासांत १ लाख ३२ हजार ७८८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत घट होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. देशभरात ३२०७ करोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत १ लाख ३२ हजार ७८८ करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३२०७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २ लाख ३१ हजार ४५६ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले आहेत. याआधी सोमवारी १ लाख २७ हजार ५१० करोनाबाधितांची नोंद झाली होती तर २७९५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. सलग विसाव्या दिवशी नव्या करोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

देशातील पाच राज्यांपैकी तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत तमिळनाडूमध्ये २६,५१३, केरळमध्ये १९,७६०, कर्नाटकमध्ये १४,३०४, महाराष्ट्रात १४,१२३ तर आंध्र प्रदेशात ११,३०३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

आणखी वाचा- करोनाच्या दुसऱ्या लाटेत ५९४ डॉक्टरांचा मृत्यू – IMA

देशभरात आतापर्यंत २ कोटी ८३ लाख ७ हजार ८३२ जणांना करोनाची लागण झाली आहे. २ कोटी ६१ लाख ७९ हजार ८५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर देशात आतापर्यंत ३ लाख ३५ हजार १०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १७ लाख ९३ हजार ६४५ सक्रिय रुग्ण आहेत. तर २१ कोटी ८५ लाख ४६ हजार ६६७ जणांनी करोनावरील लस घेतली आहे.

आणखी वाचा- आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी प्रभावी कायद्याची आवश्यकता; IMA चे अमित शाह यांना पत्र

महाराष्ट्रात १४ हजार १२३ नवे करोनाबाधित

मंगळवारी दिवसभरात राज्यात १४ हजार १२३ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी राज्यात ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ५४ लाख ३१ हजार ३१९ इतका झाला असून रिकव्हरी रेट थेट ९४.२८ टक्क्यांवर गेला आहे.

Story img Loader