Kerala Rape Case : केरळमध्ये गेल्या पाच वर्षांत ६४ जणांनी तिचे लैंगिक शोषण केल्याचा दावा एका दलित समाजातील मुलीने केला आहे. तिने याबाबत तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समुपदेशन सत्रादरम्यान मुलीने तिच्या त्रासाचा खुलासा केल्यानंतर बाल कल्याण समितीने (CWC) केलेल्या तक्रारीनंतर पठाणमथिट्टा पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
स्वयंसेवी संस्थेला मिळाली माहिती
महिला समक्य नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी त्यांच्या नियमित क्षेत्र भेटीचा भाग म्हणून मुलीच्या घरी पोहोचल्यावर ही बाब उघडकीस आली. मुलीने पाच वर्षांमध्ये अनुभवलेल्या भयावहतेचे कथन केले. त्यानंतर एनजीओने पथनामथिट्टा जिल्ह्यातील बालकल्याण समितीकडे याची तक्रार केली. CWC ने मुलीला समुपदेशन दिले आणि तिने मानसशास्त्रज्ञांसमोर खुलासा केला. तिच्या समुपदेशन सत्रादरम्यान, मुलीने दावा केला की ती केवळ १३ वर्षांची असताना तिच्या शेजाऱ्याने तिच्यासोबत पॉर्न व्हिडिओ दाखवून अत्याचार सुरू केले. ती आता १८ वर्षांची आहे.
हेही वाचा >> Bihar Scam : अपत्यहिन महिलांना गरोदर करा अन् ५ लाख मिळवा; बिहारमध्ये अनोखा स्कॅम; पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश!
व्हिडिओही केले व्हायरल
्
्
संबंधित पीडित मुलगी शाळेत खेळाडू आहे. या मुलीला प्रशिक्षणादरम्यानही लैगिंक शोषणाचा सामना करावा लागला. एवढंच नव्हे तर तिचे काही व्हिडिओही व्हायरल करण्यात आले होते. यामुळे तिच्या मनावर मोठा आघात झाला होता. आतापर्यंत १० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीचा सविस्तर जबाब नोंदवला गेला असल्याचं पोलिसांनी सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी अत्याचार
तक्रार दाखल करणारे CWC पथनमथिट्टा जिल्हा अध्यक्ष एन राजीव यांनी सांगितले की, समिती मुलीची आवश्यक ती काळजी आणि संरक्षण देईल. “प्रकरण गंभीर आहे. मुलगी आठवीत असल्यापासून सुमारे पाच वर्षांपासून तिच्यावर अत्याचार केले जात होते. ती खेळात सक्रिय होती आणि सार्वजनिक ठिकाणीही तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप आहे.” दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी करायला सुरुवात केली आहे.