उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांना भेटायला येण्यापूर्वी दलित समाजातील लोकांना आंघोळ करून येण्याचा फतवा काढण्याच्या निर्णयाचा गुजरातमधील डॉ. आंबेडकर वेचन प्रतिबंध समितीकडून अभिनव पद्धतीने निषेध करण्यात येणार आहे. त्यासाठी या संघटनेकडून योगी आदित्यनाथ यांना तब्बल १६ फुटांचा साबण पाठवण्यात येणार आहे. जेणेकरून दलितांना भेटण्यापूर्वी योगी आदित्यनाथ यांना आंघोळ करता येईल, असा टोला या संघटनेने लगावला आहे.
योगी आदित्यनाथ यांनी स्वत:ची मनुवादी मनोवृत्ती दाखवून दिली आहे. त्यांच्यामधील ही अशुद्धता दूर झाली पाहिजे, असे संघटनेचे सदस्य किर्ती राठोड आणि कांतीलाल परमार यांनी सांगितले. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांना हा साबण पाठवण्यापूर्वी ९ जूनपर्यंत तो अहमदाबाद येथे प्रदर्शनासाठी ठेवला जाणार आहे. वाल्मिकी समाजातील महिला हा साबण तयार करणार आहेत, अशीही माहिती संघटनेतर्फे देण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा